Bangalore Political News: कर्नाटकातील लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकण्याचे उद्दिष्ठ ठेवून काँग्रेसने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच काँग्रेसने भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपच्या काही विद्यमान खासदारांना गळाला लावण्याचे काम सुरू असून काँग्रेस नेते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेस भाजपला पुरते चारीमुंड्या चित करण्याच्या प्रयत्नात आहे. (Congress's strategy to give BJP a swindle)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि जनता दलाला कर्नाटकात मोठा धक्का देण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. सुमारे १५ ते २० आमदार काँग्रेसने गळाला लावले असून या आमदारांचा काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस नेते तथा कॅबिनेट मंत्री चेलुवरायस्वामी यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान, भाजप लोकसभा निवडणुकीत काही विद्यमान खासदारांचे तिकिट कापणार असल्याची चर्चा आहे. त्यांना गळाला लावण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. त्यामुळे आमदारांबरोबरच काही खासदारांनाही काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा कट शिजला जात आहे. भाजपत गेलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काँग्रेस नेत्यांनी संपर्क साधून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
धर्मनिरपेक्ष जनता दलाचा बालेकिल्ला असलेल्या मंड्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सातपैकी पाच जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. आता काँग्रेसचे लक्ष्य मंड्या लोकसभा मतदारसंघ असून तो जिंकण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. धजदपासून दुरावलेले नेते पुट्टराजू यांना काँग्रेसच्या गोटात खेचण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. त्यासाठी कृषीमंत्री चेलुवरायस्वामी हे प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे पुट्टराजू हे धजदच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत.
काँग्रेसचे डाव हाणून पाडण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर सोपवली आहे. येडियुराप्पा यांनी हायकमांडच्या सूचनेनंतर बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी भाजप आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. काँग्रेस डावपेच उधळून लावण्याबाबत चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.