Rohit Godara Sarkarnama
देश

Sukhdev Singh Gogamedi : कॅनडात कट, राजस्थानात हत्या; करणी सेनेच्या गोगामोडी प्रकरणात नवा ट्विस्ट

Rajasthan gangster Rohit Godara : गोगामोडी हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक

Sunil Balasaheb Dhumal

Rajasthan Political Crime News : राजस्थानमध्ये करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामोडी यांच्या हत्येप्रकरणी पोलिस तपासात मोठी माहिती समोर आली आहे. सुखदेव सिंह यांच्या हत्येचा कट कॅनडात रचला होता. त्यांची अंमलबजावणी राजस्थानमध्ये करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत याप्रकरणी दोन हल्लेखोरांसह चंदीगड येथून तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

गोगामेडी यांची ५ डिसेंबर रोजी जयपूर येथील त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेच्या सीसीटीव्हीच्या चित्रफितीत हल्लेखोर गोगामेडीवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या जयपूर येथील रोहित राठोड आणि हरियाणाच्या महेंद्रगड येथील नितीन फौजी यांची ओळख पटवली आहे. तर दोन आरोपींना चंदीगडमधून अटक केली आहे. त्यांना जयपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

करणी सेनेचे प्रमुख गोगामेडी यांच्या हत्येच्या कटाचा सूत्रधार राजस्थानचा गँगस्टर रोहित गोदारा कॅनडामध्ये राहत असल्याची माहिती आहे. त्याचा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी जवळचा संबंध आहे. गोदाराने गोगामेडीला मारण्याचे काम आणि शूटर नेमण्याची जबाबदारी वीरेंद्र चरणवर सोपवल्याचे समजते.

तुरुंगात भेट

बलात्कार प्रकरणात राजस्थानमधील अजमेर तुरुंगात शिक्षा भोगत असताना चरण आणि गोदाराची भेट झाली. गोदाराने पोलिसांना सांगितले की, गोगामेडीने आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यातून त्याने बदला घेण्याचा कट रचला होता. त्यानुसार चरण गोदाराच्या रागाचा फायदा घेऊन त्याला गोगामेडीला मारण्यासाठी तयार केले.

चरणने त्याचा दुसरा नेमबाज नितीन फौजीला तुरुंगात टाकले. फौजी यास परदेशात स्थायिक व्हायचे असल्याने त्यांनी चरण यांच्याकडून सल्ला मागितला होता. त्यावर त्याने मदतीचे आश्वासन दिले होते. या दोन्ही शूटर्सनी गोगामेडीची हत्या करण्याचा कट रचला. ते दोघेही हत्येच्या आधी आणि नंतर चरणच्या संपर्कात होते.

बंदुकांचा शोध सुरूच

चरणने त्याच्या नेटवर्कद्वारे जयपूरमधील दोन्ही शूटर्सना बंदुका पाठवल्या. या दोघांनी नंतर शहरातील एका हॉटेलजवळ बंदुका पुरल्याचे सांगितले जाते. पोलीस त्या बंदुका शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राथमिक तपासात गोदारा आणि गोगामेडी यांच्यात मालमत्तेचा वाद उघड झाला होता. दरम्यान, हत्येनंतर राजस्थानमध्ये निषेधाचे मोर्चे निघून लागले आहे. त्यामुळे या प्रकरणी 11 सदस्यीय एसआयटी नेमण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशी केली कटाची अंमलबजावणी

गोगामेडी हत्येचा कट रचणाऱ्यांपैकी एक असलेल्या रामवीरने हत्येपूर्वी जयपूरमधील त्याचा मित्र फौजी याच्या मदतीने हा कट रचण्याची तयारी केली होती. त्यानुसार गोगामेडी यांना भेटण्याच्या बहाण्याने आरोपी त्यांच्या घरी गेले होते. काही मिनिटे बोलल्यानंतर त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला. त्यांनी गोगामेडी यांचा सहकाऱ्याचीही हत्या केली. हा हत्येची लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गँगस्टर रोहित गोदाराने जबाबदारी स्वीकारली.

असे पकडले शूटरला

रोहित गोदाराने यापूर्वी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, गोगामेडी आपल्या शत्रूंना मदत करत होते आणि त्यामुळेच हा हल्ला झाला. गोगामेडीच्या हत्येनंतर शूटर रोहित गोदाराचा जवळचा सहकारी वीरेंद्र चौहानच्या संपर्कात होता. शूटर्सचे नवीनतम लोकेशन त्यांच्या मोबाईल फोनवरून ट्रेस करण्यात आले. ते पळून जात असताना वीरेंद्र चौहान यांना फोन करत होते. आरोपी आधी ट्रेनने हिस्सारला गेले होते. त्यानंतर मनालीला गेले. दिवसभर बाजारात मुक्कामही केला. मंडीतील तिघेही चंदीगडला आले, तिथे त्यांना पकडण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT