Rakesh Tikait
Rakesh Tikait  
देश

भाजपकडून माझ्या हत्येचे षडयंत्र; राकेश टिकेत यांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकेत (Rakesh Tikait) यांच्यावर गेल्या आठवड्यात कर्नाटकात शाई फेक करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आता राकेश टिकेत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून (BJP) आपल्या जिवाला धोका असून आपली हत्या करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा राकेश टिकेत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Rakesh Tikait latest news)

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राकेश टिकैत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ''भाजप सरकारला माझी हत्या करायची आहे. भाजप माझ्याविरोधात षडयंत्र रचत असून माझी हत्या करू पाहत आहे. कर्नाटकातही हल्ल्याचा कट रचण्यात आला, या हल्ल्यातच माझा जीव गेला असता. कर्नाटकातही माझ्यावर हल्ला झाला, मी हात पुढे केला. जर मी हात पुढे केला नसता तर हल्लेखोराने माझ्या डोक्यात वार केला असता, असा दावाही टिकेत यांनी केला आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कायदा आपलं काम करेलच, असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात कर्नाटकातील बंगळुरूमध्येही राकेश टिकेत यांच्यावर हल्ला झाला होता. एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर शाई फेकली होती. पत्रकार परिषद सुरू असतानाच तेथे उपस्थित लोकांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी एका व्यक्तीने टिकेत यांच्यावर शाई फेकली. यानंतर तिथे उपस्थित लोकांमध्ये तुफान हाणामारी आणि खुर्च्यांची तोडफोड झाली. पोलिसांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या आणि राकेश टिकैत यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

स्थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थंकाने टिकैत यांच्यावर शाई फेकली, असा आरोप टिकैत यांच्या समर्थकांनी केला होता. शेतकऱ्यांच्या दोन संघटनेतील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या ठिकाणी काही काळ तणाव होता. या घटनेनंतर टिकेत यांना स्थानिक पोलिसांनी कुठलीही सुरक्षा पुरवली नाही. यावरुन टिकेत यांनी सरकारवर टिका केली. "भाजप सरकारच्या सांगण्यावरुन माझ्यावर हा हल्ला करण्यात आला," असा आरोप टिकेत यांनी केला होता.

दरम्यान, वर्षभरापूर्वी राकेश टिकेत यांच्या ताफ्यावर राजस्थान येथे हल्ला झाल्याची घटना घडली होती. राजस्थानमध्ये काही लोकांच्या गटाने हा हल्ला केला होता. टिकेत अलवरमधील हरसौरामध्ये एका सभेला संबोधित केल्यानंतर बानसूरला जात होते. यावेळी ततारपूरमध्ये घोळक्याने टिकेत यांच्या ताफ्यावर दगडफेक सुरु केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT