IAS-IPS Officer Dispute News
IAS-IPS Officer Dispute News  Sarkarnama
देश

Officer Dispute : फेसबूक पोस्टवरून IAS-IPS महिला अधिकारी भिडल्या; सरकारने थेट उचललं 'हे' पाऊल

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News : कर्नाटकमधील दोन IAS आणि IPS महिला अधिकारी फेसबूक पोस्टवरून भिडल्याचे समोर आले आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी एकमेकींविरोधात आरोप करत एकमेकींचे खासगी फोटो शेअर केले. त्यामुळे या वादाची दखल थेट कर्नाटक सरकारने घेतली.

या वादानंतर सरकारने दोन्ही अधिकाऱ्यांची मंगळवारी (दि.21 फेब्रुवारी) थेट बदली केली. त्यामुळे या दोन महिला अधिकाऱ्यांच्या वादावर कर्नाटकमध्ये चांगलीच चर्चा रंगली. या दोन्ही अधिकाऱ्यांची पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली. त्यामुळे या महिला अधिकाऱ्यांना एकमेकींविरोधात आरोप-प्रत्यारोप करणं चांगलच महागात पडलं.

नेमकं काय घडलं?

आयपीएस रूपा मौदगल यांनी आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्यावर आरोप केला की,''जेव्हा रोहिणी मंड्या जिल्हा पंचायत सीईओ झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्यावर शौचालयांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप होता. तर आकडे वाढवून केंद्र सरकारकडून त्यांनी पुरस्कार मिळवल्याचा आरोप होता, पण याची कुठलीही चौकशी झाली नाही''.

रूपा यांनी आरोप केला की, ''फेसबुकवर सिंधुरी यांनी काही खासगी फोटो शेअर केले. सिंधुरी यांनी पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना तिचे फोटो पाठवून सेवा आचार नियमांचे उल्लंघन केले'', असा दावा करत तरी देखील रोहिणी यांच्यावर कारवाई झाली नाही. असा आरोपही रूपा यांनी केला.

तसेच सिंधुरीने 2021-22 मध्ये त्यांची फोटो तीन अधिकाऱ्यांसोबत शेअर केले होते, असा दावा डी रूपा यांनी केला. तसेच याबाबत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिवांकडे तक्रारही केली होती.

या आरोपानंतर सिंधुरी म्हणाल्या, ''हे आरोप निराधार आहेत. एका जबाबदार पदावर असलेल्या रुपा ह्या वैयक्तिक द्वेषातून आपल्याविरोधात अशा प्रकारचे आरोप करत आहेत. तेसच त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे त्या वागत आहेत'', असं त्या म्हणाल्या.

तसेच सिंधुरी यांनी सांगितले की, ''मी हे फोटो काही अधिकाऱ्यांना पाठवल्याचा आरोप त्यांनी केला. पण मी त्यांना त्यांची नावे जाहीर करण्याची विनंती करते. मानसिक आजार ही मोठी समस्या आहे. यासाठी औषधोपचार आणि समुपदेशन आवश्यक आहे'', असं म्हणत सिंधुरी आक्रमक झाल्या.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं,''या वादावर पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांना देखील याची माहिती आहे. या प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण मीडियासमोर येऊन असं वागणं योग्य नाही'', असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT