Asaduddin Owaisi| Chandrashekar Rao Sarkarnama
देश

Telangana Vidhansabha Election : तेलंगणातील पोस्टरवरून रंगला वाद; ओवैसींचा काँग्रेस, भाजपवर हल्लाबोल

Sachin Waghmare

Telangana News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठी चुरस पहावयास मिळत आहे. बीआरएस, काँग्रेस व भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता तेलंगणात भाजपच्या व्यंगचित्र पोस्टरवरून राजकारण तापले आहे. एमआयएमचे खासदार असदूदिन ओवैसी यांनी भाजपवर हल्लाबोल करत या व्यंगचित्रांचा समाचार घेतला.

तेलंगणात भाजपच्या व्यंगचित्र पोस्टरवरून एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी भाजपला धारेवर धरत हल्लबोल केला. या व्यंगचित्रांचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले, भाजपने मला एका व्यंगचित्रात बीआरएस आणि काँग्रेसचे लग्न लावणारा काझी असे दाखवले आहे. मी लग्न लावणारा काझी कसा होऊ शकतो. पण मी जर काझी झालो तर खूप कठीण जाईल, अशा शब्दात त्यांनी भाजपला फटकारले आहे.

काँग्रेसवर हल्लाबोल करताना खासदार ओवैसी म्हणाले की, अल्पसंख्याकांसाठीचा त्यांचा जाहिरनामा फसवा आहे. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होत आहे. बीआरएस, भाजप व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीआधीच व्यंगचित्रावरून वाद रंगला आहे.

एकमेकांवर केली जातेय चिखलफेक

या पोस्टरवरून एकमेकावर चिखलफेक केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेलंगणाचे वातावरण आमच्यासाठी पोषक वाटत असल्याने भाजपकडून अशा प्रकारची चिखलफेक करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT