देश

पंतप्रधान मोदी भाषण देऊन आले तिथं आदित्य ठाकरेंनी पुरस्कार स्वीकारलाय...

Inspiring Regional Leadership असे महाराष्ट्राला मिळालेल्या पुरस्काराचे नाव आहे.

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम यावर संयुक्त राष्ट्र हवामान बदल अर्थात COP26 परिषद ब्रिटनच्या स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात सुरु आहे. या परिषदेत जागतिक पातळीवर महाराष्ट्राला हवामान बदलासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

Inspiring Regional Leadership असे महाराष्ट्राला मिळालेल्या पुरस्काराचे नाव आहे. Under2 Coalition Leadership Awards 2021 पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. स्कॉटलंडमध्ये ३ पुरस्कारांपैकी असलेला हा एक पुरस्कार राज्याच्यावतीने आदित्य ठाकरे यांनी स्वीकारला आहे.

ट्विटवरुन या पुरस्काराविषयी माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले, स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतात महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत. त्यांनीच हरित भविष्य पाहण्याची प्रेरणा दिली आहे. माय प्लॅनेट अशी चळवळ आम्ही सुरु केली असून निसर्गाच्या पारंपरिक पाच घटकांकडे जास्त लक्ष देत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी पुरस्काराचा स्विकार करताना सांगितले. तसेच आपल्या शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत.

गत रविवारी पंतप्रधान मोदींचे संबोधन

पंतप्रधान मोदींनी गत रविवारी याच ठिकाणी हवामान बदलावर संबोधित केले होते. COP26 परिषद ३१ ऑक्टोबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. जगभरातील जवळपास २०० देशांमधील नेते आणि प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते, भारतासारख्या विकसनशील देशांसाठी हवामान बदल ही मोठी समस्या आहे. हवामान बदलामुळे शेतीत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागले आहेत. अवेळी पडणारा पाऊस, पूर या संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच २०७० पर्यंत भारतातील उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असेही मोदी यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT