Lok Sabha Speaker Om Birla Sarkarnama
देश

Lok Sabha Session Update : लोकसभेत प्रचंड गदारोळ; अमित शहांच्या अटकेचा मुद्दा अन् विधेयक फाडून अंगावर फेकले…

Amit Shah introduces 3 bills in Lok Sabha today : विधेयकानुसार, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री, ज्यांना पाच वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असलेल्या फौजदारी कलमांतर्गत सलग 30 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले असेल तर 31 व्या दिवशी त्यांना पदावरून हटविण्यात येईल.

Rajanand More

Parliament Session Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून हटविण्याची तरतूद असलेली तीन विधेयके लोकसभेत सादर केली. या विधेयकांना सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. याचदरम्यान विरोधी बाकांवर शहांच्या अटकेचा जुना मुद्दा उकरून काढण्यात आला. त्याला शहांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिले.

विरोधकांनी तीव्र विरोध करताना विधेयकांच्या प्रतीही फाडल्या. त्याचे तुकडे अमित शहांच्या दिशेने फेकण्यात आले. यावेळी अमित शाह यांच्याकडून विधेयकांबाबत भाष्य केले जात होते. विरोधी खासदारांनी सभागृहातील मोकळ्या जागेत येत मोठा गदारोळ घालण्यास सुरूवात केल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तीन वाजेपर्यंत स्थगित केले.

अमित शहांनी दुपारी दोन वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक, संविधान (130 वी सुधारणा) विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्गठन (सुधारणा) विधेयक ही तीन विधेयके सादर केली. त्याला विरोधकांनी जोरदार विरोध केला.

असदुद्दीन ओवेसी, मनिष तिवारी, के. सी. वेणुगोपाल यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ही बिले परत घेण्याची मागणी केली. वेणुगोपाल यांनी विरोध करताना थेट अमित शहांच्या अटकेचा मुद्दा काढला. गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांना अटक झाली त्यावेळी नेैतिकता दाखवत त्यांनी राजीनामा दिला होता का, असा सवाल त्यांनी केला.

वेणुगोपाल यांच्या या विधानाला शहांनी लगेच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, माझ्याविरोधात खोटे आरोप करण्यात आले होते. नैतिकतेच्या आधारावर मी लगेच राजीनामा दिला होता. न्यायालयाकडून आरोप खोटे सिध्द होईपर्यंत कोणतेही संविधानिक पद स्वीकारले नव्हते, असे शहांनी म्हटले. शहांनी यादरम्यान ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविली जाणार असल्याचेही सांगितले. मात्र, विरोधकांचा गदारोळ कमी झाला नाही. काही खासदारांंनी विधेयकाच्या प्रती फाडून त्याचे तुकडे शहांच्या दिशेने फेकले. त्यामुळे कामकाज स्थगित करावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT