H3N2 Influenza : Appeal to Use Mask  Sarkarnama
देश

Corona News : कोरोनाचा कहर वाढला! तीन राज्यात पुन्हा मास्कसक्ती..

Corona News : सलग तिसऱ्या पाच हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले..

सरकारनामा ब्यूरो

Appeal to Use Mask : देशभरात एकूणच कोरोनाचा धसका वाढताना करताना दिसत आहे. कोराना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. याबाबतीत नवनवीन आकडे समोर येत आहे. यामुळे सरकारपातळीवर धास्ती असतानाचा, सर्वसामान्यही लोकही भयभीत झाले आहेत. आज ( दि.९ एप्रिल) सलगपणे तिसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. मागील २४ तासात देशभरात ५ हजार ३५७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे ६ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले होते. (Corona News Update)

याचसोबत देशभरात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या ३२,८१४ पेक्षा जास्त झाली आहे. हा आकडा टक्केवारीत पाहिला तर ०.०७ टक्के आहे. तसेच मागील चोवीस तासात गेल्या २४ तासात ३७२६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, एकूण कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४१,९२,८३७ झाली आहे. तर कोरोमामुळे आतापर्यंत मृत नागरिकांची संख्या ५,३०,९५४ झाली आहे.

मागील केवळ चोवीस तासात देशभरात १,५७,८९४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाकाळानंतर आतापर्यंत एकूण २२०.६६ कोटी लसी देण्यात आले आहेत. सर्वात मोठे लसीकरण राबवण्यात आले आहे.

आता कोरोना प्रभावाची वाढणारी प्रकरणं लक्ष वेधले असता, केरळ आणि पुद्दुचेरीसह अनेक राज्यांनी याबाबत कठोर पावले उचललायला सुरूवात केली आहे. केरळ राज्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर पुद्दुचेरीत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणंही बंधनकारक करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT