Corona News |BF.7
Corona News |BF.7 Sarkarnama
देश

Corona News : BF.7 व्हेरिअंटमुळे टेन्शन वाढलं ; चीनहून भारतात परतलेला रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह!

सरकारनामा ब्यूरो

Corona News : उत्तर प्रदेश येथील आग्रामध्ये एक व्यक्ती कोरोना संक्रमित झाली आहे. लागण झाली असून, ही व्यक्ती नुकतीच २३ डिसेंबर रोजी चीनहून भारतात परतली होती. भारतात दाखल झाल्यानंतर त्याने एका खासगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली होती. या तपासणी चाचणीत त्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तिची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे कळताच, येथीलआरोग्य विभागानं तडक त्याचे घर गाठले. या संबंधित व्यक्तीचं घर गाठून, लगेच सील करण्यात आलं आहे.

या वर्षाच्या शेवटी बरेच व्यापारी लोक व्यवसायासाठी विदेश दौरा करत असतात आणि विदेशातून परतलेले प्रवासी परतल्यानंतर त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल, अशी माहिती आग्र्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण श्रीवास्तव यांनी दिली आहे.

चीनमध्ये सध्या कोरोनाचा कहर पाहायला माजला आहे. चीनमधील कोरोनाची परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याचा दावा केला जात आहे. यामुळे चीनमधून भारतात परतणारी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने प्रशासन दक्ष आहे. या व्यक्तीचं आता रूग्णालयात उपचार केला जात आहे. कोरोना प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, खबरदारी घेणं गरजेचे आहे. कोरोना बाधित व्यक्तीवर सध्या उपचार हो आणि निरीक्षण केलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT