Corona Update News : Supreme Court News :
Corona Update News : Supreme Court News :  Sarkarnama
देश

Corona Update News : समलिंगी विवाह प्रकरणी सुनावणी करणाऱ्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण!

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. यामध्ये आता मोठी माहिती समोर येत आहे. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशही (Supreme Court) कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. सर्वोच्च न्य़ायालयातील एकूण चार न्यायाधीशांना कोव्हीड १९ (Covid-19) ची लागण झाली आहे, तर आणखी न्यायाधीश एक न्यायाधीश नुकतेच कोरानातून बरे झाले आहेत.

यात विशेष बाब म्हणजे कोरोना लागण झालेल्या या चारही न्यायाधीशांचा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्याच्या प्रक्रियेत समावेश होता. यामुळे या प्रकरणाला आता विलंब होण्याची शक्यता आहे.

समलिंगी प्रकरणी सुनावणी करणाऱ्या खंडपीठातील आणखी एका न्यायाधीशाची प्रकृती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्यांना तूर्त तरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. याचा परिणाम म्हणजे सोमवारी समलिंगी विवाहप्रकरणी होणारी सुनावणी आता पुढे ढकलले गेले आहे. दरम्यान, कोरोनाच्या कालावधीच्या पहिला दोन टप्प्यांमध्ये न्यायालयीन कामाकाजामध्ये प्रतिकूल परिणाम झाला होता. त्यावेळी ही अनेक न्यायमूर्ती आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

रविवारी (23 एप्रिल 2023) देशात एकाच दिवशी कोरोनाचे 10,112 नवे रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला. तर शनिवारी 12000 पेक्षा अधिक कोरोना संसर्गाच्या रुग्ण आढळून आले होते. आता देशभरात कोरोनाच्या 67,806 केसेस अॅक्टीव्ह आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT