Nagaland Assembly Election Result
Nagaland Assembly Election Result Sarkarnama
देश

Tripura Assembly Election : त्रिपुरात काटेकी टक्कर...नागालँडमध्ये भाजपा तर मेघालयात...जाणून घ्या अपडेट

सरकारनामा ब्यूरो

Meghalaya Assembly Election Result : ईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) मतदान पार झाले होते. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारीला मतदान संपन्न झाले होते.

आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार परडत आहे. त्रिपुरात भाजप, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी ( एनडीपीपी) व मेघालयमध्ये नॅशनल पीपल्य पार्टी (एनपीपी) आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

त्रिपुरामध्ये भाजपा (BJP) 28, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि काँग्रेस (Congress) 18, टीपरा १३ जागांवर आघाडीवर आहे. नागालँडमध्ये एनडीएचा घटकपक्ष एनडीपीपी 40, एनपीएफ 5 व काँग्रेस 1 तर अपक्ष १३ जागांवर आघाडीवर आहे. मेघालयात एनपीपी 23, काँग्रेस 4 आणि भाजप (BJP) ७ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मेघालयमध्ये ७४. ३२ टक्के मतदान झाले होते. मेघालय विधासभेच्या ६० जागांसाठी मतदान झाले. येथे २१. ६ लाख मतदान आहेत. तर ३६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये ३६ महिला उमेदवारांचाही समावेश आहे. तृणमूल काँग्रेस आणि अन्य राज्यस्तरीय पक्षांनी या निवडणुकीत मोठी लढत दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT