Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : सत्ता जाताच कोर्टाचा केजरीवालांना मोठा दणका! 2019 मधील 'या' प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश

Arvind Kejriwal court order : आम आदमी पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी (ता.11) दिले. या प्रकरणाचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी दिले आहेत.

Jagdish Patil

New Delhi News, 11 Feb : आम आदमी पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी (ता.11) दिले. या प्रकरणाचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी दिले आहेत.

2019 साली द्वारका येथे पक्षाचे मोठे होर्डिंग्ज लावण्यासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे दिल्लीत दहा वर्षांची सत्ता आम आदमी पक्षाने (AAP) गमावताच काही आठवड्यांनंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार परवेश वर्मा यांनी पराभूत केलेले अरविंद केजरीवाल दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत परवाने देण्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अनेक महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर त्यांना ही धोरण रद्द करावं केलं होतं. दिल्ली मद्य विभागातील कॅगच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की,

"आप सरकारने तयार केलेल्या 2021-2022 च्या उत्पादन शुल्क धोरणामुळे दिल्लीच्या तिजोरीचे ₹2000 कोटींहून अधिक नुकसान झालं." दरम्यान, मागील आठवड्यातच दिल्लीचे भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आप सरकार चालवत असलेल्या 'मोहल्ला क्लिनिक'मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

त्यानंतर दिल्लीतील भाजप सरकारच्या 'मोहल्ला क्लिनिक' बंद करण्याच्या निर्णयावर आपचे वरिष्ठ नेते जैन यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार टीका केली होती. त्यावर "आपचे नेते आमच्यावर क्लिनिक बंद केल्याचा आरोप करतात, परंतु खरं हे आहे की आम्ही त्यांची भ्रष्टाचाराची दुकाने करत आहेत"; असं प्रत्युत्तर सचदेवा यांनी दिलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT