PM Narendra Modi directs heightened COVID protocols as Delhi political leaders face mandatory RTPCR testing amid rising infection fears.  Sarkarnama
देश

COVID alert : कोरोनाचा धोका वाढला, पंतप्रधान मोदीही झाले सावध; भेटीगाठींबाबत घेतला मोठा निर्णय...

COVID-19 Resurgence Across India: What’s Happening Now : दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच सर्व नेत्यांना भोजनाचे आमंत्रण दिले आहे. आज सायंकाळी दिल्लीतील जवळपास 70 नेते मोदींना भेटणार आहेत.

Rajanand More

PM Modi Takes Precaution Amid Rising Infections : भारतात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात बुधवारी सकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा 7 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामध्ये दररोज वाढ होत असल्याने केंद्र सरकारही सतर्क झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्याची दखल घेण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधानांनी मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच सर्व नेत्यांना भोजनाचे आमंत्रण दिले आहे. आज सायंकाळी दिल्लीतील जवळपास 70 नेते मोदींना भेटणार आहेत. त्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, मंत्री, सर्व सात खासदार, आमदार व इतर प्रमुख नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणार आहे. त्या प्रत्येकाला कोरोनाची आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. याबाबत ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिले आहे.

https://www.youtube.com/watch?v=oc778SjwvLMसध्यातरी या भेटीबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. पंतप्रधानांना भेटण्यासाठी इतर नेत्यांनाही टेस्ट करावी लागणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती नाही. पुढील महिन्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्व खासदारांनाही ही टेस्ट बंधनकारक केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात 7 हजार 121 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 जानेवारीपासून आतापर्यंत 8 हजार 573 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असून हा आकडा 2 हजार 223 एवढा आहे. त्याखालोखाल गुजरातचा क्रमांक लागतो. या राज्यातील रुग्णांचा आकडा 1223 एवढा आहे. 

दिल्ली 757 रुग्णांसह तिसऱ्या आणि पश्चिम बंगाल 747 रुग्णांसह चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांचा आकडा 615 आहे. या पाच राज्यांमध्येच कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीत अधिक दक्षता घेतली जात असल्याचे समजते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT