"Vice President Jagdeep Dhankhar sends a congratulatory letter to CP Radhakrishnan after his political victory." Sarkarnama
देश

Jagdeep Dhankhar News : राधाकृष्णन विजयी होताच जगदीप धनखड यांनी धाडले पत्र; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले...

CP Radhakrishnan Wins Key Political Battle : जगदीप धनखड यांनी राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच उपराष्ट्रपतीपदाबाबत भाष्य केले आहे. त्यांनी आरोग्याचे कारण ते पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 21 जुलैला राजीनामा दिला होता.

Rajanand More

Vice President Jagdeep Dhankhar Sends Letter : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांना 452 मते मिळाली असून इंडिया आघाडीचे उमेदावर बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले आहे. धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यातच ते आतापर्यंत एकदाही सार्वजनिक व्यासपीठावर आले नाहीत. निवडणुकीनंतर मात्र त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धनखड यांनी आपले उत्तराधिकारी राधाकृष्णन यांना पत्र पाठविल्याचे समोर आले आहे. या पत्रातून धनखड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पद सोडल्यानंतर धनखड यांचे हे पहिल्या सार्वजनिक भाष्य आहे. त्यामुळे त्यालाही महत्व प्राप्त झाले आहे.

पत्रात काय म्हटलं?

धनखड यांनी पत्रातून राधाकृष्णन यांना शुभेच्छा देताना पहिले आहे की, तुमच्या व्यापक अनुभवाने उपराष्ट्रपती पदाचा अधिक गौरव होईल. या प्रतिष्ठित पदावर तुम्ही विराजमान होणे हे आपल्या देशातील लोकप्रतिनिधींचा विश्वास दर्शवितो. सार्वजनिक जीवनातील राधाकृष्णन यांचा व्यापक अनुभव पाहिल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली हे पद निश्चितपणे अधिक सन्मान आणि गौरव प्राप्त करेल, असे धनखड म्हणाले आहेत.

दरम्यान, धनखड यांनी राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच उपराष्ट्रपतीपदाबाबत भाष्य केले आहे. त्यांनी आरोग्याचे कारण ते पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 21 जुलैला राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. पण या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्याचप्रमाणे आजपर्यंत ते एकदाही ना मीडियासमोर आले ना कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर. ते कुटुंबासह उपराष्ट्रपतींसाठी असलेल्या अधिकृत निवासस्थानी आहेत.

धनखड यांच्या या भूमिकेवरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवर निशाणा साधला जात आहे. निकालानंतरही काँग्रेसच्या नेत्यांना धनखड यांची आठवण आली. निवडणुकीचा निकाल लागला तरी धनखड अद्याप समोर आलेले नाहीत, असे सांगताना या नेत्यांनी राधाकृष्णन यांना राज्यसभा सभापती पदाचे महत्वही सांगितले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, मीडिया सेलचे प्रमुख जयराम रमेश आदी नेत्यांनी याबाबत भाष्य केले आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT