BJP Gujarat election
BJP Gujarat election  sarkarnama
देश

Gujarat News : BJP आमदारावर बलात्काराचा गुन्हा, काँग्रेस, 'आप' ला गुन्ह्यातही भाजपनं मागे टाकलं..

सरकारनामा ब्युरो

Gujarat MLA News : यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण ५२.५ टक्के मतं पडली आहेत. आज (सोमवारी) भुपेंद्र पटेल हे गुजराचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

गुजरातमध्ये भाजप सातव्या सत्तेत येत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीतील १८२ आमदारांच्या निवडणूक अर्जाचे विश्लेषण एडीआर या संस्थेनं केले आहे. या विश्लेषणातून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एडीआरच्या या अहवालानुसार, ४० नवनियुक्त आमदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास सुरु आहे. यात ४० पैकी २९ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या एका आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

काँग्रेस, आम आदमी पक्ष, भाजपच्या प्रत्येकी एका आमदारांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. पण यात एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या वर्षींच्या तुलनेत गुन्हे दाखल असलेल्या आमदारांच्या संख्या ही आता कमी आहे. २०१७ मध्ये ४७ आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.

एकुण १६ टक्के आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यात खून, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. २९ आमदारांपैकी २० आमदार भाजप, ४ काँग्रेस, २ आम आदमी पक्ष, २ अपक्ष , १ समाजवादी पक्षाचा आमदारांवर अशा प्रकारचे गुन्हे आहेत. सर्वाधिक गुन्हे हे भाजप आमदारांवर दाखल आहेत, याची संख्या २६ आहे.

पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत.

मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत जितू वाघानी, हर्ष संघवी, किरीट सिंह राणा, कनू देसाई, भानू बाबरिया शंभूप्रसाद टुंडिया, मौलू बेरा, दर्शना देशमुख , पीसी बरंजडा यांच्यासह २५ जणांच्या नावाचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT