मुंबई : कुत्र्याशी खेळण्यावरून झालेल्या वादातून जुहू येथे एका २५ वर्षीय तरुणाची हत्या (murder) झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच झाली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शेखर नायर याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. सूरज कनोजिया (Suraj Kanojia) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
बुधवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पूर्ववैमन्यासातून हा प्रकार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी शेखर नायर आणि मृत सूरज कनोजिया हे नेहरुनगर येथे राहतात. काल (बुधवारी) रात्री साडेआठ वाजता नेहरुनगर येथे सूरज कनोजिया याची आई ही लहान मुलांसोबत बसली होती. ते कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळत होते.
यावेळी अचानक शेखर याने सूरज आणि त्याच्या आईवर चाकूने हल्ला केला. या हल्लात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान सूरज कनोजिया याचा मृत्यू झाला. तर सूरजची आई लक्ष्मी या मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपी शेखर नायर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.