CSDS- Pre-Poll Survey Sarakrnama
देश

CSDS- Pre-Poll Survey : राम मंदिर, हिंदुत्व, कलम 370 नाही तर जनता 'या' मुद्द्यांवर करणार मतदान

Lok Sabha Elections 2024: राम मंदिर, हिंदुत्व, कलम 370, हुकूमशाही, अघोषित आणीबाणी अशा मुद्द्यांचा आधार घेतला जात आहे. पण मतदारांना नेमकं काय हवंय, लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत? या प्रश्नांची उत्तरे एका सर्व्हेतून समोर आली आहेत.

Rashmi Mane

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपकडून BJP मागील दहा वर्षांत झालेला विकास, राम मंदिर, हिंदुत्व, कलम 370, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर जोर दिला जात आहे, तर विरोधकांकडून हे सर्व मुद्दे खोडून काढत हुकूमशाही, अघोषित आणीबाणी अशा मुद्द्यांचा आधार घेतला जात आहे. पण मतदारांना नेमकं काय हवंय, लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत? या प्रश्नांची उत्तरे एका सर्व्हेतून समोर आली आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील मतदाराचे 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज'ने (CSDS) सर्वेक्षण केले आहे. मतदारांसाठी भ्रष्टाचार, राम मंदिर, हिंदुत्व या भावनिक मुद्द्यांपेक्षा बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि ढासळती आर्थिक परिस्थिती मतदारांसाठी महत्त्वाची आहे आणि ते या मुद्द्यांवरच मतदान करू शकतात, असे लोकसभा निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सीएसडीएस-लोकनीतीने द हिंदूच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले आहे. या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात सुमारे दोन तृतीयांश किंवा सुमारे 62% लोकांनी सांगितले की, नोकऱ्या मिळवणे अधिक कठीण झाले आहे. असे मानणारे शहरांमध्ये 65% आहेत. खेड्यातील 62% लोक आणि शहरातील 59% लोक यावर विश्वास ठेवतात. 59% स्त्रियांच्या तुलनेत 65% पुरुषांनी हे मत दिले आहे. केवळ 12% लोकांनी नोकरी मिळवणे सोपे झाले आहे, असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गरीब आणि मध्यमवर्गावर अधिक परिणाम

अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा सर्वाधिक परिणाम गरीब आणि मध्यमवर्गावर होत आहे. श्रीमंत वर्गावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असल्याचे निर्देशांक दाखवतात, मात्र मतदारांना त्याचा परिणाम जाणवत आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार, मतदारांची सर्वात मोठी चिंता बेरोजगारीची आहे. सर्वेक्षण केलेल्या लोकांना जेव्हा विचारण्यात आले की त्यांची सर्वात मोठी समस्या कोणती आहे, तेव्हा 27 टक्के लोकांनी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले. Unemployment Inflation Are The Important Issues Trend In CSDS Pre Election Survey

बेरोजगारी

बेरोजगारीनंतर महागाई ही दुसरी सर्वात मोठी समस्या आहे. यामध्ये महागाई 23%, विकास 13%, भ्रष्टाचार 8%, अयोध्येतील राम मंदिर 8%, हिंदुत्व 2%, भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा 2% आणि आरक्षण 2% ने सर्वात मोठी समस्या मानली गेली आहे.

महागाई

बेरोजगारीनंतर महागाई ही दुसरी सर्वात मोठी समस्या आहे. यामध्ये महागाई 23%, विकास 13%, भ्रष्टाचार 8%, अयोध्येतील राम मंदिर 8%, हिंदुत्व 2%, भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा 2% आणि आरक्षण 2% ने सर्वात मोठी समस्या मानली गेली आहे.

CSDS सर्वेक्षणाचे निष्कर्ष हे सांगतात की आर्थिक संकट ही मतदारांसाठी चिंतेची बाब आहे.

  • अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी मिळू न शकण्याची भीती,

  • महागाईचा त्यांचा वास्तव जीवनावर आणि उपजीविकेवर होणारा परिणाम

  • ग्रामीण भागातील दुर्दशेची वस्तुस्थिती या सर्वेक्षणातील लोकांच्या मनात आहेत.

अहवालात असे ही दिसते की कमी आर्थिकदृष्ट्या संपन्न लोक या संकटाचा अधिक तीव्रतेने सामना करत आहेत. आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांना आर्थिक आव्हानांचा सामना कमी करावा लागतो.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT