Congress Leader D K Shivakumar sarkarnama
देश

D K Shivakumar on Exit Polls : काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांना काॅन्फिडन्स,'एक्झिट पोल खोटे, आम्हाला...'

Lok sabha Exit Polls 2024 Congress : एक्झिट पोल करताना खोलात जात नाहीत. वरवरचे हे सर्वेक्षण केले जाते. माझ्यावर विश्वास ठेवा इंडिया आघाडी सत्ता मिळवणार आहे, असे डी के शिवकुमार म्हणाले.

Roshan More

Exit Polls 2024 : लोकसभा निवडणुकी आधीच एक्झिट पोलने निकाल जाहीर झाल्याचे चित्र आहे. भाजप एकतर्फी विजय मिळवत एनडीएच्या साथीने 350 पार करत असल्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात राज्यात देखील काँग्रेसला एक ते तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार D K Shivakumar यांनी आपला एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. 'मला फोन आले की काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये एक किंवा दोन जागा मिळतील. पण मी स्पष्ट सांगतो की काँग्रेसला दुहेरी अंकात जागा कर्नाटकमध्ये मिळणार आहे', असे डी के शिवकुमार यांनी ठणकावून सांगितले.

एक्झिट पोल करताना खोलात जात नाहीत. वरवरचे हे सर्वेक्षण केले जाते. माझ्यावर विश्वास ठेवा इंडिया आघाडी सत्ता मिळवणार आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा चांगले यश काँग्रेसला मिळणार आहे, असा डी के शिवकुमार म्हणाले.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला Congress दोन किंवा तीन जागा मिळण्याच्या दाव्याची काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, मी कर्नाटकमधूनच राज्यसभेचे उमेदवार आहे. त्यामुळे तेथे काय सुरू आहे. हे मी चांगले सांगू शकतो. चार जून नंतर एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल यात मोठं अंतर असेल

...295 जागा मिळणार

इंडिया आघाडीला 295 जागा मिळणार, असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. राहुल गांधी यांनी देखील एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की एक्झिट पोल हे मोदीच्या दबावाखील खोटे आकडे दाखवत आहे. इंडिया आघाडीला 295 जागा मिळणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT