PM Modi Delhi Car Blast  Sarkarnama
देश

Delhi Car Blast 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या राजधानीत झालेल्या कारस्फोट घटनेवरची प्रतिक्रिया समोर

Delhi Car Blast 2025 Live Updates : हा स्फोट कारमधील सीएनजी सिलेंडरच्या स्फोटामुळं झाल्याचं सांगितलं जात आहे, पण घातपाताच्या अँगलनंही दहशतवादी विरोधी पथकाकडून याचा तपास केला जात आहे. या संपूर्ण घटनेचं लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं पहायला मिळतील.

सरकारनामा ब्युरो

Delhi Car Blast 2025 Live Updates : देशाची राजधानी नवी दिल्लीत एका कारमध्ये शक्तीशाली स्फोट झाल्यानं दिल्ली हादरली आहे. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, त्यामुळं आजुबाजुला उभ्या असलेल्या काही कारला आग लागली. यामध्ये या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. या स्फोटोच्या हादऱ्यानं काही घरांच्या आणि रस्त्यावरील दिव्यांच्या काचा फुटल्याचंही सांगितलं जात आहे. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचं माध्यमांनी दिलेल्या वृत्तामधून कळतं आहे. हा स्फोट कारमधील सीएनजी सिलेंडरच्या स्फोटामुळं झाल्याचं सांगितलं जात आहे, पण घातपाताच्या अँगलनंही दहशतवादी विरोधी पथकाकडून याचा तपास केला जात आहे. या संपूर्ण घटनेचं लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं पहायला मिळतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या राजधानीत झालेल्या कारस्फोट घटनेवरची प्रतिक्रिया समोर 

काँग्रेस नेते राहुल गांधींचं दिल्ली स्फोटानंतर पहिलं ट्विट, म्हणाले... 

दिल्ली स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; कारच्या मालकाला पोलिसांनी केली अटक 

दिल्ली कार स्फोटप्रकरणात वापरण्यात आलेली आय 20 कारच्या मालकाचे नाव समोर आले आहे. या कारची पासिंग हरियाणातील गुरुग्राम येथील आहे. या कारचा मालक मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर असल्याचं समोर आलं आहे. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान,त्यानं ही कार त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचंही समोर आलं आहे.

पंतप्रधान मोदींचं दिल्ली कारस्फोटनंतर पहिलं ट्विट, म्हणाले...

दिल्लीत सोमवारी (ता.10) संध्याकाळी झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही मोदींनीही यावेळी केली. तसेच मोदींनी ट्विटमध्ये जखमींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतल्याचंही पीएम मोदी यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतही हायअलर्ट जारी, सीएसटीसह विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली

दिल्लीतील कार स्फोटानंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील सीएसटीसह विविध प्रमुख ठिकाणांवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सर्व पोलिस ठाण्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नाकाबंदी करण्यात आली आहे. ग्राऊंड इंटेलिजन्स नेटवर्क सक्रिय करण्यात आलं आहे. संवेदनशील भागात गस्त वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिल्लीतील कार स्फोटावर प्रतिक्रिया, म्हणाले,'सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह...'

खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिल्लीतील कार स्फोटावर त्यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नवी दिल्ली येथील लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात आठ ते दहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. ज्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते, तेथेच हा स्फोट झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात घटनास्थळी आणि जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात जाणार

New Delhi News: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इको कारमध्ये सोमवारी(ता.10) मोठा स्फोट झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहितीनुसार, स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा दहा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. माझी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशीही चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी तपास यंत्रणांना सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहे. थोड्याच वेळात अमित शाह घटनास्थळी जाणार असून जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातही ते जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सर्वात मोठी बातमी! दिल्ली स्फोटप्रकरणी दोन संशयित ताब्यात

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी आहे. पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आता  दिल्ली स्फोटप्रकरणी दोन संशयित ताब्यात घेण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींचा दिल्लीतील कार स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांना फोन  

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट गृहमंत्री अमित शहांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मोदींनी शहांकडून कार स्फोटाबाबत अधिकची माहिती जाणून घेतली आहे.

Delhi Blast : अमित शहांनी घेतली स्फोटाची दखल! दिल्ली पोलिसांकडून जाणून घेतली परिस्थिती

Delhi Blast : रिक्षा ड्रायव्हरनं सांगितली आपबिती; स्फोटावेळी नेमकं काय घडलं? 

Delhi Blast : दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट जाहीर 

दिल्लीत कारमध्ये भीषण स्फोट झाल्यानंतर आता मुंबईतही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पोलिसांकडून मुंबईत खबरदारी घेतली जात आहे, माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.

Delhi Blast : घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका दाखल होत आहेत

SCROLL FOR NEXT