Arvind Kejriwal News Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News: केंद्र सरकारचा अध्यादेश येताच केजरीवाल घेणार शरद पवार अन् उद्धव ठाकरेंची भेट!

Political News: अरविंद केजरीवाल घेणार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट

सरकारनामा ब्यूरो

Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार यांच्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या अधिकारावरून पुन्हा एकदा जुंपली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या मुद्यांवरून दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारला दिले. मात्र, हा आदेशच पलटवण्यासाठी केंद्र सरकारने नवा अध्यादेश आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांची डोकेदुखी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या 24 मे रोजी उद्धव ठाकरे आणि 25 मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील सरकारी आधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्राच्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मिळावा, यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी आज दिल्लीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली असून ते आता लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याबरोबरच या भेटीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होणार का? आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधी पक्ष एकवटताना दिसत असून त्याबद्दल या भेटीत काही चर्चा होणार का? असे अनेक सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT