दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात जामीन शुक्रवारी ( 13 सप्टेंबर ) सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला. 156 दिवस तुरुंगात असतानाही मुख्यमंत्रिपद न सोडणाऱ्या केजरीवाल यांनी बाहेर येताच राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
केजरीवालानंतर ( Arvind Kejriwal ) दिल्लीचा मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा तीन दिवस सुरू होती. अखेर आम आदमी पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दिल्लीच्या मंत्री आतिशी या नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. 'आप'च्या आमदारांची बैठक दिल्लीत पार पडली. तेव्हा, आतिशी यांच्या नावावर सर्वांनी पसंती दर्शवली आहे. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील.
आतिशी दिल्ली सरकारमध्ये सर्वाधिक मंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये आतिशी या सुद्धा आहेत. केजरीवाल यांनी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतिशी, सौरभ भारद्वाज आणि कैलास गेहलोत यांची नावे चर्चेत होती. मात्र, आतिशी यांच्या नावालाच सर्वांधिक पसंती होती.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना जेलवारी झाली होती, तेव्हा त्यांच्याकडील शिक्षण विभागाचे मंत्रालय आतिशी यांना देण्यात आलं होतं. आतिशी यांनी दिल्लीचा अर्थसंकल्पही मांडला होता.
कालकाजी मतदारसंघातून निवडून आलेल्या आतिशी यांच्याकडे या शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, अर्थ, बांधकाम, पाणी, वीज, जनसंपर्क अशा मंत्रालयाचा पदभार आहे. यापूर्वी 2015 पासून 17 एप्रिल 2018 पर्यंत दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार आतिशी राहिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.