After attack on Delhi CM Rekha Gupta, Delhi Police Commissioner ABK Singh replaced by Satish Golcha; CM gets Z-category CRPF security cover. Sarkarnama
देश

Delhi Police : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक : पोलिस आयुक्तांना अवघ्या 21 दिवसांत हटवलं

Delhi Police : दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस दलात मोठा फेरबदल झाला. पोलिस आयुक्त ए. बी. के. सिंह यांना हटवले असून सतीश गोलचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री गुप्ता यांना झेड सुरक्षा देण्यात आली.

Hrishikesh Nalagune

Delhi Police : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त ए. बी. के. सिंह यांना अवघ्या 21 दिवसांत हटविण्यात आले असून त्यांच्या जागी सतीश गोलचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंह यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार होता. याशिवाय मुख्यमंत्री गुप्ता यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना आता सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा लागू करण्यात आली आहे.

नवे पोलिस आयुक्त सतीश गोलचा हे 1992 च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्ली त्यांनी विशेष आयुक्त, सहआयुक्त, पोलिस उपायुक्त या पदावर काम केले आहे. या नियुक्तीपूर्वी ते तिहार तुरुंग प्रशासनाचे महासंचालक होते. 2020 मध्ये झालेली दंगल आटोक्यात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिस प्रशासनाची मलिन झाली होती. त्यामुळे गोलचा यांच्याकडे जबाहदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांवर झाला होता हल्ला

दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी सीएम हाऊसमध्ये जनता दरबारात हल्ला झाला होता. मुख्यमंत्री लोकांचे प्रश्न ऐकून घेत असताना एका 40 वर्षीय व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कानशिलात लगावत याव्यक्तीनं त्यांचे केसही ओढले. यात त्या किरकोळ जखमी झाल्या होत्या. त्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ माजला होता. त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी कोर्टानं सुनावली आहे.

दोन दिवसांत दुससा हल्ला :

सीएम हाऊसमधील हल्ला ताजा असतानाच आज गुप्ता यांच्यावर पुन्हा दुसऱ्या एका कार्यक्रमात अशाच गोंधळाच्या प्रसंगाला समारं जावं लागलं. दिल्लीतील अशोक बाजार गांधी नगरमध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता रेडिमेड गारमेंट्स डीलर्स असोसिएशनद्वारे आयोजित 'वस्त्रिका 2025' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात एका व्यक्तीनं अचानक घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळं कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाच वातावरण निर्माण झालं. पण खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेडिंगच्या बाहेरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT