New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. तर भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत 27 वर्षानंतर सत्ता काबीज केली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंदे केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आपच्या बड्या नेत्या आतिशी यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची त्यांनी रविवारी राज निवास येथे भेट घेत राजीनामा सोपवला. यावेळी आतिशी यांच्या चेहऱ्यावरील निराशा दिसून आली. तर सक्सेना यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. आप आणि नायब राज्यपालांमध्ये सातत्याने वाद दिसून आले होते.
आतिशी यांच्या मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्रिपद आले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आतिशी यांच्या गळ्यात या पदाचा माळ टाकण्यात आली होती. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यांच्याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आतिशी कालकाजी मतदारसंघातून निवडून आल्या असल्या तरी त्यांच्या पक्षाला 70 पैकी केवळ 22 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्याच्या जवळपासही जागा नाहीत. भाजपने 48 जागा मिळवत कमाल केली. बहुमतापेक्षा पक्षाला 12 जागा अधिक मिळाल्या. त्यामुळे राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे.
विधानसभेत आप प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षात चढाओढ असू शकते. आतिशी यांच्याकडे हे पद येऊ शकते. त्या केजरीवालांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. तसेच गोपाल राय हे माजी मंत्रीही पुन्हा विधानसभेत पोहचले आहे. तेही विरोधी पक्षनेत्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे केजरीवाल कुणाला पसंती देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.