Arvind Kejriwal News Sarkarnama
देश

Arvind Kejriwal: केजरीवालांना आज अटक होऊ शकते; 'आप'च्या मंत्र्यांना भीती..

Delhi Excise Case: आतापर्यंत तीन वेळा ईडीने पाठवण्यात आले असून ते एकदाही ईडीसमोर हजर झालेले नाहीत.

Mangesh Mahale

Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तिसरे समन्स बजावले आहे. त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नकार दिला आहे. यापूर्वी २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर रोजी दोन समन्स बजावून ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. त्यांना आज ईडी (सक्तवसुली संचालनालय) अटक करू शकते, असा दावा खुद्द आम आदमी पक्षानेच केला आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरासमोर आणि 'आप'च्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी सुरू झाली आहे. मात्र, ईडीच्या सूत्रांच्या मते, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात येतील, अशी शक्यता 'आप'कडून व्यक्त करण्यात येत आहे.

केजरीवालांना आज अटक होण्याची भीती दिल्ली सरकारचे मंत्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्यक्त करीत आहेत. मद्यविक्री धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत तीन वेळा सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठविले आहेत. ते एकदाही ईडीसमोर हजर झालेले नाहीत.यामुळे केजरीवाल यांच्या अटकेची भीती 'आप'च्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री सौरभ भारद्वाज सोशल मीडियावर म्हणतात, 'ईडी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांना अटक करणार असल्याचे ऐकले जात आहे,"

"सक्तवसुली संचालनालय सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापा टाकणार असल्याची बातमी येत आहे. त्याला अटक होण्याची शक्यता आहे," असे मंत्री आतिशी यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

ईडीने पाठविलेल्या तिसऱ्या समन्सवर अरविंद केजरीवाल बुधवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत.आपण निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यग्र आहोत, त्यामुळे त्यांना जे काही विचारायचे आहे, ते लेखी स्वरूपात पाठवावे, असे उत्तर त्यांनी ईडीला पाठवले आहे.

'आप'च्या नेत्यांनी दावा केला आहे की, ईडी आज केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते आणि त्यांना अटकही करू शकते. दिल्लीचे मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दावा केला आहे की, ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT