दिल्ली : राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या विषारी हवेपासून दिल्लीकरांना सुरक्षित ठेवायचे असेल तर किमान दोन दिवस तरी लॉकडाऊन लावण्याबाबत विचार करावा असा सल्ला काल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला फटकारताना दिला होता. त्यानंतर अवघ्या ३ तासात दिल्ली सरकारला जाग आली आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे.
यानुसार आता दिल्लीत सोमवारपासून शाळा एक आठवड्यासाठी बंद राहणार आहेत. तसेच दिल्ली सरकारची सर्व कार्यालय देखील एक आठवड्यासाठी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करण्यात आली आहेत. तसेच खाजगी कार्यालयांसाठीही वर्क फ्रॉम होमचे आवाहन करण्यात आले आहे. १४ ते १७ नोव्हेंबर या दरम्यानच्या कालावधीमधील बांधकामाची कामेही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
९ दिवस उलटल्यानंतरही दिल्लीतील जनतेला प्रदूषणाने भरलेल्या प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत आहे. यात पुढील आणखी ५ ते ६ दिवस प्रदूषणाचा कहर राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली सध्या प्रमाणापेक्षा साडेचार पट अधिक प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत. हवेत PM-10 या प्रदूषक कणांचे प्रमाण ४५७ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि PM-2.5 कणांचे प्रमाण २८४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असल्याचे सांगण्यात येते आहे.
मानकांनुसार, PM-10 चे प्रमाण १०० च्या खाली आणि PM-2.5 चे प्रमाण ६० च्या खाली असेल, तर ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते. त्यामुळे दिल्लीच्या हवेत सध्या साडेचार पटीने जास्त प्रदूषण आहे. दिवाळी काळात झालेली आतिषबाजी, बांधकामे आणि पंजाब आणि हरियाणाच्या शेतात पिकांचे अवशेष जाळले जात असल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.