Arvind kejriwal  Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : केजरीवालांच्या विरोधात याचिका करणाऱ्याला 50 हजारांचा दंड, न्यायालयाने सुनावले खडेबोल

Delhi High Court : हा सिनेमा नाही याचे सिक्वेल यायला हवा. तुमच्या साठीमारीमध्ये आम्हाला ओढू नका. ही राजकीय भाषणं ठोकायची जागा नाही. त्यासाठी रस्त्यावर बाहेर जा. न्यायलयाचा बहुमुल्य वेळ वाया घालवू नका, असे न्यायलयाने सुनावले

Roshan More

Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन देखील फेटाळलेला आहे. मात्र, केजरीवाल अटकेत असताना देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. तुरुंगातूनच ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे म्हणून दिल्ली हायकोर्टमध्ये Delhi High Court याचिक दाखल करण्यात आली होती.पण, हायकोर्टाने याचिकाकर्तेला खडे बोल सुनावत 50 हजार रुपयांचा दंड ठोठवला.

याचिकाकर्त्यांने मुख्यमंत्री पदावरून केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना हटवण्यात यावे यासाठी आधीच दोनदा याचिका केली होती. मात्र दोन्ही वेळा न्यायलयाने ती फेटाळली होती. मात्र, याचिकाकर्त्याने सलग तिसऱ्यांदा याचिका दाखल करत मुख्यमंत्रीपदावरून केजरीवाल यांना हटवण्याची मागणी केली. त्यामुळे न्यायाधीस संतप्त झाले त्यांनी याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंड थोटावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा सिनेमा नाही याचे सिक्वेल यायला हवा. तुमच्या साठीमारीमध्ये आम्हाला ओढू नका. ही राजकीय भाषणं ठोकायची जागा नाही. त्यासाठी रस्त्यावर बाहेर जा. न्यायलयाचा (Court) बहुमुल्य वेळ वाया घालवू नका, असे सुनावत न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका देखील न्यायालयाने मंगळवारी (ता. 9) फेटाळली. त्यामुळे केजरीवालांना सर्वोच्च न्यायलयात जावे लागणार आहे. उच्च न्यायालयाने ईडीने दिलेले पुरावे वैध आहेत असे म्हणत घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांचा सहभाग दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT