Brijbhushn Sinh News Sarkarnama
देश

Brij Bhushan Sharan Singh News : दिल्ली हायकोर्टाचा ब्रिजभूषण सिंहांना दणका; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित

Sachin Waghmare

Delhi News : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह हे गेल्या काही दिवसापासून एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर सहा कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला होता. त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने धक्का दिला आहे.

न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. तर यापूर्वीच सत्ताधारी भाजपने (BJP) त्यांना लोकसभेचे तिकीट न देता त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले. लोकसभेची उमेदवारी न दिल्यानंतर काही दिवसांनीच ब्रिजभूषण सिंह (Brijbhushn Sinh) यांच्यासाठी हा दुहेरी धक्का मानला जात आहे.

महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषणप्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ब्रिजभूषण यांच्यावर व यासोबतच ब्रिजभूषणचे सचिव विनोद तोमर यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेशही दिले आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

ब्रिज भूषण यांच्यावर कलम 354 अन्वये महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले तर विनोद तोमर यांच्यावर कलम 506(1) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सहा महिला कुस्तीपटूंनी 15 जून 2023 रोजी दिल्ली पोलिसांत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला होता. मात्र सहाव्या कुस्तीपटूकडून केलेल्या आरोपप्रकरणी आरोप निश्चित करण्यास न्यायालयाचा नकार दिला आहे. तर 26 एप्रिल रोजी न्यायालयाने ब्रिजभूषण यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळला होता.

दरम्यान, या सर्व आरोपामुळे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून ते एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आहेत. विशेषतः सत्ताधारी भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट न देता त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले आहे. त्यामुळे लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर काही दिवसांनीच ब्रिजभूषण सिंह यांना हा दुहेरी धक्का बसला आहे.

SCROLL FOR NEXT