Sanjay Singh Sarkarnama
देश

Sanjay Singh News : खासदार संजय सिंह निवडणुकीत प्रचार करणार का? ‘या’ पाच अटींवर जेलमधून येणार बाहेर

Delhi Liquor Scam Case : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संजय सिंह यांना जामीन मंजूर झाल्याने ‘आप’ला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ते निवडणुकीत प्रचार करणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Rajanand More

New Delhi News : कथित मद्य घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh News) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने कालच त्यांना जामीन मंजूर केला असून, आज ते जेलमधून बाहेर येणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपची तोफ धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कोर्टाकडून जामीन देताना काही अटीही घातल्या आहेत. त्यामुळे संजय सिंह यांच्या प्रचारातील सहभागाबाबत उत्सुकता वाढली आहे.

भाजपसह (BJP) मोदी सरकारवर संसदेत आणि संसदेबाहेर सतत तोफ डागणारे नेते म्हणून संजय सिंह (Sanjay Singh) यांची ओळख आहे. मागील वर्षी त्यांना ईडीने अटक केली होती. जवळपास सहा महिन्यांनंतर ते आज जेलमधून बाहेर येणार आहेत. या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही सध्या जेलमध्ये आहेत.

सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) आदेश घेऊन आज संजय सिंह यांचे वकील दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात दाखल झाले. जामिमीनासाठी संजय सिंह यांच्या पत्नी जामीनदार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रमुख पाच अटी घालण्यात आल्या आहेत. त्यांच्या निवडणुकीत प्रचारावर कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ते लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना दिसतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आहेत पाच महत्त्वाच्या अटी

1. दिल्ली-एनसीआर सोडून जाता येणार नाही. तसे करायचे असल्यास प्रशासनाला त्याची माहिती द्यावी लागेल. संपूर्ण कार्यक्रमाची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल. आपले मोबाईलचे लोकेशन त्यांना ऑन ठेवावे लागणार असून, त्याची माहिती तपास अधिकाऱ्याला द्यावी लागेल.

2. घोटाळ्याप्रकरणी संजय सिंह यांना आपली भूमिका मीडियासमोर किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडता येणार नाही. या प्रकरणावर ते काहीच बोलणार नाहीत. 

3. कोर्टात पासपोर्ट जमा करावा लागेल.

4. तपासात सहकार्य करावे लागेल. तपास अधिकाऱ्यांना मोबाईल क्रमांकांची माहिती द्यावी लागेल.

5. प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करता येणार नाही.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT