Arvind Kejriwal Sarkarnama
देश

CM Arvind Kejriwal News : केजरीवालांचे ‘ते’ दोन आदेश वादात; ईडीच्या दाव्याने अडचणी वाढणार?

Delhi Liquor Scam News : केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवत असून, त्यांनी आतापर्यंत दोन आदेश दिल्याचा दावा आपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यावरच भाजपने आक्षेप घेतला आहे.

Rajanand More

New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News Live Updates) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी जेलमधून दोन आदेश दिल्याचा दावा आपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यावर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर ईडीनेही आता मोठा दावा केला आहे.

जेलमध्ये केजरीवालांना कोणत्याही फाइलवर किंवा आदेशावर सही करण्याची परवानगी नाही. ते चोवीस तास सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहेत, असे ईडीने स्पष्ट केले आहे. पत्नी किंवा वकिलांच्या भेटीवेळी त्यांनी सही केलेली असल्यास त्याबाबत कोर्टाला माहिती दिली जाईल, असेही ईडीने म्हटले आहे.

केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मागील आठवड्यात त्यांनी जेलमधून राज्यातील पाणीप्रश्नाप्रकरणी एक आदेश दिल्याचा दावा मंत्री आतिशी यांनी केला होता. त्यांनी तो आदेशची प्रतच प्रसिद्ध केली होती, तर कालही रुग्णालयांतील औषध पुरवठ्याबाबत केजरीवालांनी आदेश दिल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला होता.

केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसून ते जेलमधूनच सरकार चालवत असल्याचे आपचे नेते सांगतात. त्यावर भाजपने (BJP) जोरदार आक्षेप घेत तक्रार केली आहे. जेलच्या नियमानुसार त्यांना कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणत्याही फाइलवर सही करता येऊ शकत नाही, ते बैठक घेऊ शकत नाहीत. त्यानंतरही त्यांच्या कार्यालयाकडून आदेश निघत असतील, तर ते बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत ईडीकडून (ED) खुलासा करण्यात आला आहे. केजरीवालांनी जेलमध्ये कोणत्याही आदेशावर सही केलेली नाही. मुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे. त्यांना सरकारी फायलींवर सही करण्याची परवानगी नाही. त्यांना जेलमध्ये भेटण्यासाठी सायंकाळी पत्नी आणि वकिलांना मुभा देण्यात आली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी फायलींवर सही केली आहे का, याबाबत ईडीकडून तपास केला जात आहे.

भेटीदरम्यान केजरीवालांनी फायलींवर सही केली असेल, तर ते जेलच्या नियमांचे उल्लंघन आहे. ही बाब 28 मार्चला ईडीकडून कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली जाऊ शकते. त्यामुळे केजरीवालांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. दरम्यान, केजरीवाल जेलमध्ये असेपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे आपच्या (AAP) नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT