Delhi Mayor Shelly Oberoi Sarkarnama
देश

Shelly Oberoi : महापौरांच्या फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ; आठवडाभरापासून पेज झाले होते हॅक

Rajanand More

Delhi News : दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांचे फेसबुक पेज आठवडाभरापासून हॅक झाल्याचे समोर आले आहे. हॅकर्सने या पेजवर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. ओबेरॉय यांना आठवडाभरापासून आपले पेज हाताळता येत नव्हते. अखेर शनिवारी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीमने या पेजचा अॅक्सेस मिळवता आला आहे.

शैली ओबेरॉय (Delhi Mayor Shelly Oberoi) यांनी शुक्रवारी सकाळी आपले फेसबुक (Facebook) पेज हॅक झाल्याची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरून दिली होती. ‘मी माझे फेसबुक पेजचा वापर करू शकत नाही. हे पेज हॅक केल्याची माहिती मिळाली आहे,’ असे सोशल मीडिया टीमने सांगतिल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर आज दुपारी पुन्हा या पेजचा अॅक्सेस मिळवता आला आहे.

याविषयी माहिती देताना शैली ओबेरॉय यांनी सांगितले की, मागील आठवडाभरापासून मला फेसबुक पेज हाताळता येत नव्हते. काल अचानक काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचे दिसते. त्यानंतर कुणीतरी हे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच हे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले. काल रात्री नऊ वाजता याबाबतची माहिती आम्हाला मिळाली.

आमची सोशल मीडियाची टीम रात्रभऱ यावर काम करत होती. आज दुपारी फेसबुक पेजचा अॅक्सेस पुन्हा मिळवण्यात यश आले, असे शैली यांनी सांगितले. जगभरात सायबर गुन्हे वाढत आहेत. तंत्रज्ञान हे जेवढे फायदेशीर आहेत, तेवढेच धोकादायकही. हॅकर्सकडून गैरवापर होऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा ओबेरॉय यांनी व्यक्त केली. शैली या आपच्या नेत्या असून दहा महिन्यांपुर्वीच महापौरपदाची माळ गळ्यात पडली आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT