Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Sarkarnama
देश

Delhi MCD Election Result LIVE : दिल्ली महापालिकेवर आपचा झेंडा ; स्पष्ट बहुमत

सरकारनामा ब्युरो

दिल्ली महापालिकेवर आपने झेंडा फडकावला आहे. २५० पैकी २४० जागांचे निकाल हाती आले आहेत. यात १३४ जागांवर आपने विजय मिळवला आहे. आपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपने ९९ जागा पटकावल्या आहेत. तर काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अद्यापपर्यंत दहा जागांचे निकाल बाकी आहे. 'सगळ्यांच्या सहकार्याने दिल्लीचा विकास करणार,' असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाने 106 जागांवर विजय मिळवला असून २६ जागांवर आघाडी घेतली आहे. आपच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर वार्ड क्रमांक 202 मधून भाजपच्या अलका राघव विजयी. सुलतानपूर माजरा वार्ड क्रमांक 43 मधून आपच्या उमेदवार बॉबी किन्नर 6714 मतांनी विजयी झाल्या आहेत.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आपला मोठा विजय मिळत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. मतदारांनी शिक्षण, वीज, आरोग्य या मुद्दांवर मतदान केलं आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले

आम आदमी पक्षाने ७५ जागांवर विजय मिळवला असून ६० जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने ५५ जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. ४८ जागांवर भाजप पुढे आहे. आपच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत मोठी अपडेट पुढे येत असून आत्तापर्यंतच्या निकालावरुन दहा जागांवर भाजपने तर ६ जागांवर आपने विजय मिळवला आहे. तर सध्या ९६ जागांवर भाजप,तर १२१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस११, बहुजन समाज पार्टी १ जागेवर आघाडी आहे.

ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. ‘आप’ 125 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 118 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस केवळ 6 जागांवर पुढे आहे.

आम आदमी पार्टी ११२, भाजप ११२ तर काँग्रेस १२ अपक्ष ४ व अन्य २ जागांवर पुढे आहेत.

दिल्ली महानगरपालिकेच्या मतदानाचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दिल्लीतील 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे.भाजप आणि आपने सत्तेचा दावा केला आहे. आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार १६ जागांवर भाजप पुढे आहे, आप ६ तर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT