Delhi MCD Mayor Election Sarkarnama
देश

Delhi MCD Election: भाजप-आप नगरसेवकांमध्ये राडा ; बाटल्या फेकल्या ; महापौरांवर हल्ला..; व्हिडिओ व्हायरल

MCD Mayor Election: बुधवारी दुपारी ते गुरुवारी सकाळपर्यंत सभागृहाचे कामकाज 6 वेळा तहकूब करण्यात आले.

सरकारनामा ब्युरो

Delhi MCD Mayor Election: सुरवातीपासून चर्चेत असलेल्या दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) शैली ओबेरॉय यांचा विजय झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या 80 दिवसांनंतर दिल्लीला नवा महापौर मिळाला आहे. शेली ओबेरॉय यांना 150 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या (BJP)रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला.

काल सांयकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर सभागृहात मात्र त्यानंतर गोंधळ झाला. निकालानंतर भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकामध्ये शाब्दीक युद्ध रंगले. आरोप-प्रत्योरोप करताना बाचाबाची झाली. बुधवारी दुपारी ते गुरुवारी सकाळपर्यंत सभागृहाचे कामकाज 6 वेळा तहकूब करण्यात आले.

भाजप आणि आप च्या नगरसेवकांध्ये हाणामारी सुरू झाली. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यामध्ये पुरुष नगरसेवकांसह महिला नगरसेवकांचाही समावेश होता. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सभागृहात गोंधळ सुरू होता.

सभासदांनी मध्यरात्री सभागृहात एकमेकांवर मतपेट्या, पाण्याच्या बॉटल फेकल्या.उशिर झाल्यानंतर ते सभागृहात तेथेच झोपले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आज (गुरुवारी) सकाळी नास्ता झाल्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले.

माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न-महापौर

"भाजपच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या गुंडगिरीचा हा अंत आहे, महिला महापौरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला," असा आरोप नव्या महापौर शैली ओबेरॉय यांनी केला आहे.

'मोबाईल' ठरला भांडणाचे कारण..

या भांडणाचे मूळ हे मोबाईल असल्याचे समोर आले आहे. स्थायी समितीची निवडणूक सुरु असताना काही नगरसेवकांनी मोबाईलसोबत आणले होते.या मोबईवर भाजपच्या काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावरुन भाजप-आपच्या सदस्यांमध्ये राडा झाला.

दरम्यान महापौर शैली ओबेरॉय त्यांच्या अध्यक्षस्थांनी असताना भाजपचे सदस्य तिथे पोहोचले त्यानंतर त्यांनी मतपेटी उलटवली. बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरु होता.

आपचे 151 नगरसेवक असून त्यापैकी 134 निवडून आले आहेत. 13 आमदार, 3 खासदार आणि एक अपक्ष नगरसेवक पाठिंबा देत आहेत. भाजपच्या बाजूने 112 नगरसेवक असून, त्यापैकी 104 नगरसेवक निवडून आले आहेत. 7 खासदार आणि 1 आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT