Sonia Gandhi Droupadi Murmu  sarkarnama
देश

Sonia Gandhi: राष्ट्रपतींना 'बिचारी महिला' म्हणणाऱ्या सोनिया गांधी अडचणीत? पप्पू यादव यांनाही विशेषाधिकार भंगाची नोटीस

President Droupadi Murmu Remark: बिचाऱ्या राष्ट्रपती, त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली होती. यावर राष्ट्रपती भवनाकडून प्रतिक्रिया आली होती.

सरकारनामा ब्यूरो

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'बिचारी महिला' म्हटल्यानं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधींसह प्रियांका गांधी यांच्या विरोधात बिहारमध्ये न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात आणखी भर पडली आहे.

सोनिया गांधी, अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्याविरोधात संसदीय विशेषाधिकार भंग करावा, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला. आदिवासी खासदारांनी राष्ट्रपतींवर सोनिया गांधींनी केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेच्या सभापतींना पत्र दिले आहे. त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. पप्पू यादव यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाला 'प्रेम पत्र'असे म्हटलं आहे.संसदीय विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी भाजपच्या खासदारांनी सोनिया गांधींना गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या विरोधातही अशा प्रकारची नोटीस पाठविण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी गेल्या दिवसापासून अनेक टीका केल्या आहेत.

राष्ट्रपतींच्या विरोधात त्यांनी खूपच अपमानकारण विधानं केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे. सोनिया गांधी, पप्पू यादव यांच्याविरोधात संसदीय विशेषाधिकार भंग करावा, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला. बिचाऱ्या राष्ट्रपती, त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली होती. यावर राष्ट्रपती भवनाकडून प्रतिक्रिया आली होती.

द्रौपदी मुर्मू यांना 'बिचारी महिला' म्हटल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोनिया गांधींवर टीका केली. "काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती पदाचा अवमान केला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे संबोधित करणं, हा केवळ त्या व्यक्तीचाच नाही तर देशाचा अपमान आहे. सोनिया गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी," असे सावंत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT