Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Modi government plans : मोदी सरकारच्या 'डिलिमिटेशन बिलाला' आणखी 54 खासदार देणार पाठिंबा? पक्षांची नावेही आली समोर

Special Parliament session News : भाजपला जर डिलिमिटेशन बिल मंजूर करायचे असेल तर एनडीएचे जेवढे खासदार आहेत, त्याव्यतिरिक्त देखील आणखी काही खासदारांची आवश्यकता आहे.

Sachin Waghmare

New Dehli News : केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरला संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे दिल्लीत वेगवान हालचाली घडत आहेत. या विशेष अधिवेशनात कोणते बी मांडणार याची उत्सुकता लागली असतानाच सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या विशेष अधिवेशनकाळात डिलिमिटेशन बिल सादर करण्याचे प्लॅनिंग मोदी सरकारकडून सुरु आहे. त्यासाठी लोकसभेत 360 खासदारांची आवश्यकता आहे.

त्यासाठी वेगवान हालचाली सुरु असतानाच केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन बिलाला पाठींबा देण्यासाठी खासदारांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. येत्या काळात आणखी 54 खासदार पाठिंबा देऊ शकतात त्यांच्या पक्षांची नावेही समोर आली आहेत. एनडीएचे घटक पक्ष नाहीत असे तीन पक्ष या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग आता अधिक सोपा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला दोन तृतियांश मतांची गरज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खासदारांचा आकडा जुळविण्यास सुरुवात झाली आहे. भाजपला (BJP) जर हे बिल मंजूर करायचे असेल तर एनडीएचे जेवढे खासदार आहेत, त्याव्यतिरिक्त देखील आणखी काही खासदारांची आवश्यकता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आणखी तीन पक्ष जे एनडीएचे घटक पक्ष नाहीत ते या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग आता अधिक सोपा होण्याची शक्यता आहे.

विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्ष या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले आहेत. जर डिलिमिटेशन बिल हे देशाच्या हिताचे असेल तर आम्ही पाठिंब्याबाबत विचार करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे सध्या आठ खासदार आहेत. दरम्यान, दुसरीकडे वायएसआर काँग्रेस देखील डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. वायएसआर काँग्रेसने या आधी देखील भाजपला अनेकदा पाठिंबा दिला आहे. वायएसआर काँग्रेसकडे चार खासदार आहेत.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमध्ये मोठी फूट पडली आहे. तृणमूलच्या तब्बल 20 खासदारांनी बंडखोरी केली, त्यांनी वेगळा गट स्थापन करून नव्या पक्षात प्रवेश केला. हे सर्व खासदार देखील डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमधील मोठा पक्ष असलेला डीएमके जो की एनडीएचा घटक पक्ष नाही, परंतु डीएमके देखील या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. डीएमकेकडे 22 खासदार आहेत. जर सर्व राज्यांना 50 टक्के जागा मिळणार असतील तर आम्ही पाठिंब्याबाबत विचार करू असं स्टॅलिन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8, डीएमकेचे 22, तृणमूलमधून बाहेर पडलेला खासदारांचा गट 20 आणि वायएसआर काँग्रेसचे 4 खासदार असे एकूण 54 खासदार आता या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग सोपा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सर्व हालचालीकडे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT