Siddaramaia
Siddaramaia  Sarkarnama
देश

Congress News : सिद्धरामय्यांच्या मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये महाभारत : कोलारमधून लढण्याचा निर्णय मागे; समर्थकांचे धरणे

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याबाबत काँग्रेस पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून सिद्धरामय्या यांनी कोलार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांनी सिद्धरामय्या यांच्या निवास स्थानासमोर धरणे धरले. कोलारमधूनच त्यांनी निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. (Demand that Siddaramaiah contest the election from Kolar itself)

शहरी आणि ग्रामीण भागातील काँग्रेसच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते अनेक वाहनांमधून मंगळवारी सकाळी बंगळूरमधील कुमारकृपा मार्गावरील सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी आले. जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक युनिट, दलित, मागासवर्गीय घटक, वक्कलिग आदी संघटनांचे हजारो नेते व कार्यकर्ते यात होते. सिद्धरामय्या यांना कोलारमधून ५० हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी करू, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

यापूर्वी सिद्धरामय्या यांनी कोलारमधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही चार महिन्यांपासून सिद्धरामय्या यांच्या प्रचारासाठी झोकून दिले आहे. त्यांनी निवडणूक लढविल्यास जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघांत विजय मिळविण्यास मदत होईल, असे समर्थकांचे म्हणणे होते. सिद्धरामय्या यांनी समर्थकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बंगळूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. सिद्धरामय्या कुठूनही निवडणूक लढवू शकतात, असे राहुल गांधी यांनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ते कोलारमधूनही निवडणूक लढवू शकतात. या प्रकरणी कोणताही गोंधळ नाही, अशी पुष्टीही शिवकुमार यांनी जोडली.

माजी उपसभापतींची स्पष्टोक्ती

माजी उपसभापती सुदर्शन यांनी सिद्धरामय्या कोलारमधूनच निवडणूक लढवणार असून काही लोक चुकीची माहिती पसरवत असल्याची प्रतिक्रिया दिली. सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून ते कोलारमधून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित करू. याबाबत माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT