Amit Shah,Devendra Fadnavis
Amit Shah,Devendra Fadnavis  sarkarnama
देश

नाराज आमदारांना फडणवीस, शहा वन-टू-वन भेटणार

सरकारनामा ब्युरो

पणजी : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गोव्यातील निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी उद्या (14 ऑक्टोबर) ला गोव्यात येणार आहेत. त्यासाठीची पूर्व तयारी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज गोव्यात येणार आहेत. आमदार, मंत्री यांना ते मार्गदर्शन करणार असून भेटीगाठीवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे . 

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly Election) वारे आता जोरात वाहत असून सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. तर उद्या (ता.१४) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. आमदार, मंत्री यांना ते मार्गदर्शन करणार असून भेटीगाठीवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे . 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपने आघाडी घेतली असून अन्य पक्षांनीही जोर लावला आहे. भाजपने पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आणि इतर निवडणुक मोर्चेबांधणीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आज गोव्यात येत आहेत. गृहमंत्री अमित शहा उद्या सकाळी गोव्यात येतील.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे त्यांचे विमानतळावर स्वागत करतील . दुपारी १ वाजता धारबांदोडा  येथील फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे भूमिपूजन करतील. २ वाजता ते फोंड्याजवळच्या कुर्टी येथील याच विद्यापीठाच्या इमारतीचे उद्घाटन करतील. ३ वाजता  ताळगाव कम्युनिटी हॉलमध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर संध्याकाळी पक्षाचे विधीमंडळातील आमदार, मंत्री त्यांच्याशी बैठक होईल. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा करून मार्गदर्शन करतील. यावेळी पक्षातील काही नाराज आमदार, मंत्री यांच्याशी ते वन-टू-वन भेटणार असून पक्षातील संभाव्य फूट  टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे . 

भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे, कोणतीही चैाकशी नाही, शांत झोप लागते...

मावळ (पुणे) : माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील त्यांच्या मिश्किलभाषणामुळे प्रसिद्ध आहे. काही दिवसापूवी त्यांनी ''मी राजकारणात आलो नसतो तर अभिनेता झालो असतो,'' असे विधान केलं होतं. अशाच प्रकारचे विधान काल त्यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. मावळ तालुक्यातील एका कार्यक्रमात भाषण देताना त्यांनी मिश्किलपणे महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. ''भाजपमध्ये मी मस्त अन् निवांत आहे, मला शांत झोप लागते. माझी कोणती चौकशी ही सुरू नाही,'' अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी सध्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सुरु असलेल्या तपास यंत्रणाच्या चैाकशीबाबत कुणाचेही नाव न घेता निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT