मुंबई : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना (Shivaji Maharaj statue desecrated in Bengaluru) झाल्या प्रकरणाचे पडसाद आता संपुर्ण राज्यभरात दिसून येत आहेत. बेळगावमध्येही या घटनेचा निषेध म्हणून मराठी भाषकांनी निदर्शने आणि रास्ता रोको केला, दगडफेकही करण्यात आली. दरम्यान या सगळ्या घटनांवर आता राज्याचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.
आम्ही स्वस्थ बसणार नाही ; शिवसेनेचा कर्नाटक सरकारला इशारा
या घटनेनंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी टि्वट करत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. आपल्या टि्वटमध्ये शिंदे म्हणतात, ''कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध.
बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही,'' असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.