Dharmendra Pradhan Sarkarnama
देश

Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधानांची विकेट पडली,राष्ट्रपतींनी स्विकारला राजीनामा; मोदींनी विश्वासू मंत्र्यांकडे सोपवली शिक्षण खात्याची जबाबदारी

BJP News: ऐन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारवर बॅकफूटवर जाण्याची वेळ आली. कथित NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग 28 दिवस तरुणाईची एकत्र मोट बांधत अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीनं मोठा लढा उभारला. या लढ्याला अखेर मोठं यश आलं असून शिक्षणंमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी शनिवारी(ता.25) राजीनामा दिला. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: ऐन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारवर बॅकफूटवर जाण्याची वेळ आली. कथित NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग 28 दिवस तरुणाईची एकत्र मोट बांधत अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीनं मोठा लढा उभारला. या लढ्याला अखेर मोठं यश आलं असून शिक्षणंमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी शनिवारी(ता.25) राजीनामा दिला. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्री म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोदी सरकारकडून जोपर्यंत नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होत नाही,तोवर जोशी हे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. 

सध्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे उपभोक्ता बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, नवीन व नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालय या खात्याचा कारभार सांभाळतात. आता पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याकडे शिक्षणखात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीनं प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द कौतुकास्पद आहे. नीट-यूजी परीक्षा आणि पेपरफुटी प्रकरणातील कथित अनियमितेमुळे देशभरात रोष पसरला होता. गेल्या साधारण महिन्याभरापासून सीजेपीचे दिल्लीच्या जंतर-मंतरच्या मैदानावर आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीमुळे झालेल्या घोटाळ्यासाठी धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका आंदोलकांकडून लावून धरण्यात आली होती.

एनईईटी परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर त्यांनी देशातील तरुणांना व जनतेला उद्देशून एक भावनिक व सविस्तर निवेदन जारी केले होते.त्यात त्यांनी हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नसून देशाच्या हिताचा व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

तसेच धर्मेंद्र प्रधानांनी जंतरमंतर व देशभरात सुरू असलेल्या परिस्थितीचा गैरफायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये, म्हणून आपण पद सोडत असल्याचे नमूद केले. देशातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि मुलांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर व करिअर घडवण्यावर केंद्रित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रात व्यक्त केली होती.

यावेळी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात आपण चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी काम केले असल्याचं सांगितलं होतं. तसेच प्रधान यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन व विश्वासाबद्दल आभार मानल्याचंही दिसून आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT