मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याला सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची मोठी चर्चा रंगली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा हा मोठा परिणाम मानला जात आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या इतिहासात आंदोलनाच्या दबावामुळे एखाद्या मंत्र्याने पद सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने गेल्या काही दिवसांत मोठे स्वरूप धारण केले होते. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी सातत्याने सरकारविरोधात भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा समोर आली. धमेंद्र प्रधान यांनी ट्विटवर आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपण आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या निर्णयामुळे केंद्र सरकारसमोर नव्या राजकीय आणि प्रशासकीय आव्हानांची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विरोधकांनीही या घडामोडीवर सरकारवर टीका करत आंदोलनाचा परिणाम स्पष्टपणे दिसून आल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, सरकारकडून पुढील काळात शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण होऊ शकतो, याचे हे महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात आंदोलनामुळे पदाचा राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय दृष्टिकोनातून ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.