Union Education Minister Dharmendra Pradhan announced his resignation amid continuing protests and political pressure. Sarkarnama
देश

Dharmendra Pradhan Resigns : अखेर मोदी सरकार आंदोलकांसमोर झुकलं : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला असल्याची माहिती आहे.

Roshan More

Dharmendra Pradhan News : केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मागील महिन्याभरापासून जंतर मंतरवर सीजेपीकडून आंदोलन करण्यात येत होते. त्याला अखेर यश आले आहे. धमेंद्र प्रधान यांनी एक्सवर आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपण आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आज आंदोलकांसोबत सरकार चर्चा करणार होते. मात्र, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत चर्चा करणार नसल्याची भूमिका अभिजीत दीपके यांनी घेतली होती. शिवाय विरोधी पक्षांनीही प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत संसदेत चर्चा करणार नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव आला होता.

प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरसह देशात विविध ठिकाणी आंदोलन होत होते. या आंदोलनाला तरुणांचा मोठा पाठींबा मिळत होता. दरम्यान, आंदोलनामुळे मागील 12 वर्षात पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत सांगितले होते की, सरकार प्रधान यांचा राजीनामाच्या ऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा विचार करत आहे. मात्र, आमचा त्याला विरोध असून आम्ही राजीनाम्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मोदी-शहापण जातील

धर्मेद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा; मोदी शहा अजेय नाहीत.. ते देखील जातील. दरम्यान, ठाकरे बंधूंनी उद्या मोर्चाचे आयोजन केले आहे. तो मोर्चा आता होणार की नाही, हे समजू शकले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT