Pakistani Seema Haider Election : Ramdas Athawale  Sarkarnama
देश

Seema Haider Election : पाकिस्तानी सीमा हैदरला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली का? आठवले म्हणतात..

Ramdas Athawale On Seema Haider Love Story : केवळ राजकारणच नाही, सीमा यांना चित्रपटांच्या ऑफर्सही येत असल्याच्या चर्चा आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : प्रेमासाठी देशाची सीमा पार करून भारतात आलेली पाकीस्तानातची सीमा हैदर (Seema Haider) एकीकडे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच, तिच्या निवडणूक लढवण्याच्या शक्यतेची चर्चा होत होती. सीमा यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या पक्षाने निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याची चर्चा जोरात सुरू होती. मात्र आता खुद्द आठवले यांनीच या वृत्ताचे खंडन करत, सीमा यांना कुठलीच ऑफर पक्षाकडून दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

दोन दिवसापूर्वीच सीमाला आरपीआय पक्षाचे महिला आघाडीचे अध्यक्षपदही देणार असल्याचा उल्लेख काही बातम्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र, आपण अशी कुठलीही ऑफर सीमाला दिली नसून, मला न विचारता प्रवक्ते किशोर यांनी घोषणा केल्याचं आठवले यांनी म्हंटले आहे. आठवले यांनी स्वतःच याबाबत खुलासा केला असल्याने आता या सर्व बातम्या अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आता दिल्ली जवळील ग्रेटर नोएडातील रबुपुरा या गावात राहायला सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमा यांचा पक्षात समावेश करण्याचा इच्छा व्यक्त केला होता.

'सीमा निर्दोष आढळल्यास, तिच्या गुप्तहेर असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि तिला भारताचे नागरिकत्व मिळाल्यास तिचा पक्षात समावेश केला जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र आता राष्ट्रीय अध्यक्षांनीच प्रवक्त्यांचा हा दावा खोडून काढल्याने या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाले आहे.

सीमा यांना चित्रपटांच्याही ऑफर्स येत आहेत :

केवळ राजकारणच नाही, सीमा यांना चित्रपटांच्या ऑफर्सही येत असल्याच्या चर्चा आहेत. अलीकडेच सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन यांनी त्यांच्या आर्थिक संकटाबद्दल भाष्य केले होते, त्यानंतर आता त्यांच्या मदतीसाठी लोकांचे हात पुढे सरसावू लागले आहेत. नुकतेच मेरठचे चित्रपट निर्माता अमित जानी यांनी सीमा आणि सचिन यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT