Digambar Durgade
Digambar Durgade Sarkarnama
देश

नोटबंदीतील त्या कामगिरीने दुर्गाडेंना मिळवून दिले अध्यक्षपद!

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरच्या प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाली आहे. (Digambar Durgade elected as chairman of pdcc bank) तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित करण्यात आले होते. याच वेळी ही निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी चर्चा करुन प्रा. दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे यांची नाव अंतिम केली.

दरम्यान दुर्गाडेंची निवड होण्यापुर्वी मावळते अध्यक्ष रमेश थोरात (Ramesh Thorat), आमदार अशोक पवार (Ashok Pawar), आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite), जेष्ठ संचालक संजय काळे (Sanjay Kale) अशा दिग्गज नेत्यांची नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. मात्र या सर्वांना मागे टाकत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतांचे विक्रम करणाऱ्या आणि निष्कलंक समजले जाणाऱ्या प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्यावर विश्वास दाखवत अजित पवार आणि वळसे पाटील या जोडगोळीने बँकेच्या चाव्या त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.

या निवडीनंतर सबंध जिल्ह्यात दिगंबर दुर्गाडे यांच्या निवडीमागील कारणांची चर्चा होत आहे. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्यावर कोणताही डाग नसणे आणि सर्वमान्य नाव असणे हिच त्यांच्यासाठी पहिली जमेची बाजू ठरली. या जोडीला त्यांचा अर्थशास्त्र विषयही त्यांचा पक्का आहे. अर्थशास्त्राच्या याच ज्ञानाने त्यांनी २०१० मध्ये बँकेला उभारी दिली. विविध घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून कारभार गतिमान व पारदर्शक केला होता.

याशिवाय त्यांना अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी त्यांची नोटबंदीच्या काळातील कामगिरी जास्त फायद्याची ठरली असे बोलले जात आहे. २०१६ मध्ये नोटाबंदी काळात बॅंकेचे अडकलेले कोट्यावधी रुपये परत आणण्याच्या तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींच्या बैठकीसाठी दुर्गाडे यांनाच पाठविण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. त्यावेळी त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर जिल्ह्यातील 'ड' वर्ग मतदार संघातील मतदारांनी तब्बल ९४८ मतांचा त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांना जिल्हा बॅकेच्या अध्यक्ष पदावर बसविण्यासाठी प्रभावी ठरला.

याबाबत बोलताना दुर्गाडे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपविलेली जबाबदारी प्रामाणिपणे पार पाडण्याचा मी कायमच प्रयत्न केला आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीचे निर्णय नेहमीच दादांनी घेतले असुन ते मी यशस्वीरित्या पार पाडले आहेत. आजची ही निवड म्हणजे शरद पवार, दादा व ताई यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांचा आणि माझ्यावर विश्वास दाखविलेल्या मतदार, कार्यकर्ते आणि जिल्हा बॅकेच्या सर्वसामान्य ग्राहकांचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT