Digvijay Singh sarkarnama
देश

हिंसाचार प्रकरणी दिग्विजय सिंह यांना एक वर्षाची शिक्षा

दिग्विजय सिंह यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, त्यामुळे संतप्त दिग्विजय सिंह आणि बीजेवायएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

सरकारनामा ब्युरो

भोपाळ : दहा वर्ष जुन्या एका प्रकरणात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh)यांना हिंसाचार प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासह सहा जणांना इंदूर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

त्यांना एक वर्षाच्या शिक्षेसह ५ हजाराचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश मुकेश नाथ यांनी ही शिक्षा सुनावली आहे. तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. १७ जुलै २०११ रोजी उज्जैनमध्ये भाजपयुमो (bjp) कार्यकर्ते जयंत राव यांनी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, त्यामुळे संतप्त दिग्विजय सिंह आणि बीजेवायएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

उज्जैन येथील माधव नगर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी पोलिसांनी दिग्विजय सिंग, प्रेमचंद गुड्डू, जयसिंग दरबार, मुकेश भाटी, अस्लम लाला, महेश परमार, अनंत नारायण मीणा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

दिग्विजय सिंह म्हणाले, ''हे १० वर्षे जुने प्रकरण असून खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. यापूर्वी माझे नाव एफआयआरमध्येही नव्हते. राजकीय दबावाखाली माझे नाव जोडण्यात आले आहे,'' ''आता आम्ही या प्रकरणी अपील करणार आहोत. विरुद्ध हाताला दुखापत असलेले चित्र उजव्या हाताला सांगितले असल्याचे वकील राहुल शर्मा यांनी सांगितले. सध्या त्यांना जामीन मिळाला असून, उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT