Disha Salian Death Case CBI Officer Seema Pahuja Investigation Sarkarnama
देश

Disha Salian: दिशा सालियन प्रकरणाचा तपास गोल्ड मेडलिस्ट CBI अधिकाऱ्याच्या हाती; कोण आहेत सीमा पाहुजा?

Disha Salian Death Case CBI Officer Seema Pahuja Investigation: गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना २०२१ मध्ये ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर’ गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले होते.

Mangesh Mahale

Mumbai News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाचे सूत्र आता सीबीआयच्या SP सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संवेदनशील आणि चर्चित गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाचा अनुभव असलेल्या पाहुजा या आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत. CBIने १३ सप्टेंबर रोजी FIR दाखल केली असून, तपासात साक्षीदारांचे जबाब, डिजिटल डेटा आणि फॉरेन्सिक पुराव्यांची पडताळणी केली जाणार आहे.

कोण आहेत सीमा पाहुजा?

सीमा पाहुजा सध्या नवी दिल्लीतील CBI मुख्यालयाच्या स्पेशल क्राइम युनिटमध्ये SP म्हणून कार्यरत आहेत. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना २०२१ मध्ये ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर’ गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले होते.

पाहुजा यांनी यापूर्वी देशातील अनेक चर्चित प्रकरणांच्या तपासात भूमिका बजावली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या CBI पथकात त्यांचा समावेश होता. उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या तपासातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

आरजी कर, गुडिया प्रकरणातही भूमिका

२०२४ मधील कोलकाता आरजी कर रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या तपास पथकातही सीमा पाहुजा होत्या. हिमाचल प्रदेशातील चर्चित ‘गुडिया’ बलात्कार-हत्या प्रकरणाच्या तपासातही त्यांनी भूमिका बजावली होती. विविध संवेदनशील प्रकरणांचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

दिशा सालियन प्रकरणात काय तपासणार?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBIने १३ सप्टेंबर रोजी दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात FIR दाखल केली. सध्या FIRमध्ये कोणालाही संशयीतांना आरोपी करण्यात आलेले नाही. CBI उपलब्ध कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळाशी संबंधित पुरावे तपासणार आहे.

दिशा सालियन यांच्या मृत्यूपूर्वी ८ जून २०२० रोजी मुंबईत झालेल्या कथित पार्टी किंवा गॅदरिंगमध्ये कोण उपस्थित होते, याचीही चौकशी केली जाणार आहे. त्या रात्रीचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी संबंधित व्यक्तींचे जबाब, कॉल रेकॉर्ड, डिजिटल डेटा आणि फॉरेन्सिक पुरावे तपासले जातील.

CBI या सर्व पुराव्यांची सांगड घालून दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तपास करणार आहे. त्यामुळे सीमा पाहुजा यांच्या नेतृत्वाखालील तपासातून पुढे कोणती तथ्ये समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT