Narayan Rane- NItesh rane  Sarkarnama
देश

दिशा सॅलियन प्रकरणात मोठा खुलासा; नारायण राणेंसह नितेश यांच्यावरही गुन्हा दाखल

Disha salian | Narayan Rane | Nitesh Rane | Shivsena : दिशा सॅलियनची बदनामी करणे राणे पिता-पुत्रांच्या अंगलटी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दिशा सॅलियन (Disha salian) आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला असून यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिशा सॅलियनवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचा आरोप आधी नारायण राणे आणि नंतर नितेश राणे यांनी केला होता. मात्र दिशाच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळून लावत व्यवसायामधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत केली होती तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. याबाबतचा अहवाल आता पोलिसांनी महिला आयोगाला दिला असून अहवालात दिशा सॅलियन पोस्ट मॉर्ट रिपोर्टनुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले आहे. तसेच ती गरोदर नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर आता दिशा सॅलियनची बदनामी करणे राणे पिता-पुत्रांच्या अंगलटी आले आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

१९ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले, दिशाची बलात्कार करुन हत्या झाली आणि जगाला सांगितले आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एक तर ती पार्टीला जात नव्हती. त्यानंतर तिला थांबायला सांगितले, पण ती थांबली नाही. घरी निघाली. त्यानंतर तिथे कोण कोण होते. पोलिस संरक्षण कोणाला होते. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलिस कोणाचं संरक्षण करत होते? तसेच दिशा सॅलियनचा पोस्ट मार्टम रिपोर्ट अद्याप का आला नाही? ती ज्या इमारतीत राहायची त्या दिवशी ८ जूनचे रजिस्टर कोणी फाडले? कोणाला इंटरेस्ट होता? असे काही सवाल उपस्थित केले होते.

त्यानंतर दिशा सॅलियन बद्दल सुशांतसिंग बद्दल कळालं त्यावेळी तो म्हणाला मी यांना सोडणार नाही. त्यावेळी काही लोक सुशांतसिंगच्या घरी गेले. त्यांच्यात दिशा सॅलियनवरुन बाचाबाची झाली आणि त्यातच त्याची हत्या झाली, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. ते पुढे म्हणाले, त्यावेळी कोणत्या मंत्र्यांची गाडी होती? त्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज गायब कसे झाले. १३ जूनच्या रात्री सीसीटीव्ही कॅमेरे होते. ठराविक माणसाची अॅम्बूलन्स कशी आली? कोणी आणली? त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी नेले? सगळे पुरावे नष्ट कोणी केले, याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे समोर येणार, असा दावा त्यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT