Congress  File Photo
देश

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांची तलवार म्यान; विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सक्रीय

प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर ते नाराज असल्याचे समजते.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा काँग्रेसला रामराम करण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर ते नाराज असल्याचे समजते. पण काही दिवसांपूर्वीच या दोघांनाही दिल्लीतत हाय कमांडची भेट घेतल्यानंतर वादावर तोडगा निघाल्याचे दिसते.

मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा हे सध्या मेघालय विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. संगमा हे खासदार विन्सेन्ट पाला यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्यापासून नाराज आहेत. दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली होती. संगमा यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेवर थेटपणे उत्तर देणे टाळले होते. परंतु, याचा पूर्णपणे इन्कार केलेला नव्हता. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात होती.

पण सध्याच्या स्थितीत संगमा यांनी तलवार म्यान केल्याचे चित्र दिसत आहे. मेघालयमध्ये सध्या तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी संगमा हे ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दीही होत आहे. त्यामुळे संगमा यांची नाराजी सध्यातरी दूर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये सध्यातरी काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, संगमा यांना फोडण्याची जबाबदारी तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गोव्यातील माजी मुख्यमंत्र्यांना फोडल्यानंतर आता मेघालयातील माजी मुख्यमंत्र्यांसाठी तृणमूलने फासे टाकले आहेत. अद्याप संगमा यांनी तृणमूलच्या ऑफरचा स्वीकार केलेला नाही.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते लुईजिन्हो फलेरो यांनी नुकताच कोलकता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह नऊ जण तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. फलेरो यांनी काँग्रेस सोडण्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा हात असल्याचा खुलासा फलेरो यांनीच केला होता. मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या जवळ गेल्याचे मानले जाते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल व प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चाही रंगल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT