DK Shivkumar 
देश

DK Shivkumar: शिवकुमार यांचा शपथविधी ठरला! राज्यपालांनी दिलं सत्तास्थापनेचं निमंत्रण; 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

DK Shivkumar: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं नाव नव्या मुख्यमंत्र्यासाठी निश्चित करण्यात आलं आहे.

Amit Ujagare

DK Shivkumar swear in ceremony : सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं नाव नव्या मुख्यमंत्र्यासाठी निश्चित करण्यात आलं आहे. आज राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं, तसंच आपल्या सहकाऱ्यांसह मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठीची तारीख आणि वेळही त्यांना कळवली आहे.

राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणामध्ये म्हटलं की, ३० मे २०२६ रोजी मला तुमचं सत्तास्थापनेचा दावा केल्याचं पत्र मिळालं. त्याला अनुसरुन मी तुम्हाला कर्नाटकचे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेण्यासाठी निमंत्रण देत आहे. हा शपथविधी ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५ या कालावधीत लोकभवनच्या परिसरात पार पडेल.

दरम्यान, डी. के. शिवकुमार यांची आज सकाळी विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर त्यांनी राज्यपालांना लिखित स्वरुपात सत्तास्थापनेचा दावा करणारं पत्र लिहिलं. त्याला राज्यपालांनी मंजुरी देत सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT