Bhagwant mann
Bhagwant mann Twitter/@ANI
देश

म्हणून... भगवंत मान पिवळ्या रंगाची पगडी घालतात

अनुराधा धावडे

नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) दणदणीत विजयानंतर भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज पंजाबच्या २५ व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याची खास बाब म्हणजे ज्या लोकांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्यात पुरुषांना पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांसाठी पिंवळ्या रंगाच्या ओढण्या परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. (Do you know the secret of Bhagwant Mann's yellow turban?)

पण तुम्हाला माहिती आहे का, की भंगवत मान पिवळ्या रंगाचीच पगडी का परिधान करतात. त्यांनी आपल्या शपथविधीसाठी पिवळ्या रंंगाची पगडी आणि ओढणीच परिधान करण्याचे आवाहन का केले होते. याचे कारण म्हणजे भगवंत मान हे स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग यांचे अनुयायी आहेत. याच कारणास्तव त्यांनी भगतसिंग यांचे मुळ गाव असलेल्या खटकर कनाल या गावातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

2014 मध्ये भगवंत मान पहिल्यांदा खासदार झाले तेव्हाही ते खटकर कलान येथे गेले होते, तेथे त्यांनी आपल्या विजयाचे प्रमाणपत्र जनतेच्या पायाशी ठेवले होते. ब्रिटीशांचे कान उघडण्यासाठी ज्या भगतसिंगांनी लोकसभेत बॉम्ब फेकले होते. त्या लोकसभेत मी नेहमीच जनतेसाठी आवाज उठवत राहिल आणि पिवळ्या रंगाची पगडीच परिधान करत राहिल.

भगवंत मान यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंजाबमधील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर आजच्या दिवशी पुरुषांनी खास पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांनी पिवळ्या रंगाची ओढणी परिधान करून येण्यासाठी आवाहनही केले होते. त्यांच्या विनंतीनंतर शपथविधी सोहळ्याला आलेल्यांनी पिवळ्या रंगाची पगडी आणि पिवळी ओढणी परिधान केलेल्या महिलांनी सोहळ्याला हजेरी लावली होती.

सोमवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत भगवंत मान म्हणाले की, 'भगतसिंग यांनी ज्या पंजाबचे स्वप्न पाहिले होते, तो पंजाब निर्माण करायचा आहे. फक्त मीच नाही तर पंजाबचे तीन कोटी लोकही माझ्यासोबत शपथ घेतील. भगतसिंगांची स्वप्ने आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायची आहेत आणि 16 मार्च रोजी आपण त्यांचे स्वप्न अंमलात आणू. 'मी एकटा मुख्यमंत्री झालो नाही. तुम्ही सगळे मुख्यमंत्री झाला. आता तुमचेच सरकार असेल, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

भगवंत मान केवळ मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले नाहीत. त्याचा प्रवासही चढ-उतारांनी भरलेला आहे. भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील शीमा मंडीजवळील सतोज गावात झाला. त्यांचे वडील महिंदर सिंग हे सरकारी शिक्षक होते आणि आई हरपाल कौर गृहिणी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT