Russia Ukraine War  
देश

रशिया-युक्रेनच्या युद्धाची ही' तीन कारणे तुम्हाला माहित आहेत का?

Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध आता तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) वादाचे आता युद्धात रूपांतर झाले आहे. या दोन देशांव्यतिरिक्त संपूर्ण जगाच्या नजरा युरोप आणि अमेरिकेवर आहेत. पण रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामागील खरे कारण तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. (Russia Ukraine War Latest news update)

युक्रेनचा NATOमध्ये सामील होण्याला रशियाचा विरोध

- रशिया-युक्रेन युद्ध आता तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. रशियाने आपल्या आणि युक्रेनमध्ये येणाऱ्यांना धमक्या दिल्या आहेत, तर अमेरिकेनेही त्याचा परिणाम फार वाईट होतील, असा कडक इशारा दिला आहे. त्याची किंमत रशियाला चुकवावी लागेल. ब्रिटनसह इतर देशही रशियाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. यावेळी रशिया आणि युक्रेनमधील युद्धामागे नाटो कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. NATO म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (North Atlantic Treaty Organization) ज्याची सुरुवात 1949 साली झाली. युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे आहे, परंतु रशिया याच्या विरुद्ध आहे. पण नाटोमध्ये सामिल होण्याला रशियाचा विरोध का आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, एकेकाळी सोव्हिएत युनियनच्या काळात मित्र असलेले हे प्रांत दोन देश झाल्यानंतर एकमेकांचे कट्टर शत्रू का झाले आहेत?

-याचे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे नाटो संघटनेत युक्रेनचा समावेश करण्यासाठी अमेरिकेने केलेली कसरत. अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या संस्थेमध्ये 30 देशांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक युरोपमधील आहेत. मात्र, यातील बहुतांश सैनिक हे अमेरिकेतील आहेत. रशियावर दबाव आणण्यासाठी आणि जुन्या मतभेदांमुळे अमेरिका अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने करत आला आहे. अमेरिकेने यापूर्वीही रशियावर निर्बंध लादून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांची ही युक्ती आजवर कामी आली नव्हती. आता अमेरिकेला हे काम युक्रेनच्या मदतीने करायचे आहे. युक्रेन NATO सोबत गेल्यास त्याचे सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर अमेरिका रशियाचे नुकसान करण्यात अंशतः यशस्वी होऊ शकते, अशी रशियाला चिंता आहे.

नॉर्ड स्ट्रीम 2 रोखलेली पाइपलाइन

- रशिया- युक्रेनच्या युद्धामागे दूसरे कारण म्हणजे यूएस आणि वेस्टर्न-युरोपियन देशांनी नॉर्ड स्ट्रीम 2 रोखलेली पाइपलाइन हे आहे. या प्रकल्पावर रशियाने अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. याद्वारे रशियाला फ्रान्स, जर्मनीसह संपूर्ण युरोपला गॅस आणि तेलाचा पुरवठा करायचा आहे. यापूर्वी ज्या पाइपलाइनमधून हा पुरवठा होत असे त्या पाइपलाईन युक्रेनमधून जात असंत. यासाठी रशिया दरवर्षी युक्रेनला लाखो डॉलर्स देत असे. नवीन पाइपलाइन बांधल्यास युक्रेनची कमाई बंद होईल. युक्रेनच्या रशियापासून वेगळे होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये याचाही समावेश आहे.

रशियाचे युक्रेनशी असलेले भावनिक नाते

- तिसरे कारण म्हणजे रशियाला युक्रेनने कोणत्याही प्रकारे अमेरिकेसोबत जाऊ नये असे वाटते. याचे एक मोठे कारण म्हणजे रशियाचे युक्रेनशी असलेले भावनिक नाते आहे. युक्रेनच्या मातीतूनच रशियाचा पाया रचला गेला. रशियाची ओळख, उरल पर्वतरांगही युक्रेनमधून जाते. अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. शीतयुद्धानंतरही परिस्थिती बदललेली नाही. दुसरीकडे, रशियाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. रशियाला फक्त आपली प्रतिष्ठा राखायची आहे आणि त्याची बदनामी थांबावी असाही हेतू आहे.

दरम्यान, युक्रेनच्या पश्चिमेला युरोप आणि पूर्वेला रशियाची सीमा आहे. 1991 पर्यंत, युक्रेन पूर्वेकडीलच्या सोव्हिएत युनियनचा (USSR) भाग होता. वेगळे झाल्यानंतरही युक्रेनमध्ये रशियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. युक्रेन सरकारही रशियन सरकारच्या आदेशानुसार काम करत होते. मात्र खालावत चाललेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि बहुसंख्य युक्रेनियन नागरिकांवर अल्पसंख्यांक रशियन भाषिक लोकांवरील राज्य, यामुळे या बंडाला खतपाणी मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT