Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde| sarkarnama
देश

Election Commission : शिंदे गटाची कादपत्रे बोगस ठाकरेंचा युक्तीवाद; तर ठाकरेंचे प्रमुखपदच बेकायदेशीर शिंदेंचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Election Commission News : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटाकडून लाखो प्रतिज्ञापत्र आणि पुरावे निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहे. धनुष्यबाण आणि पक्षचिन्हावर सुनावणी असून दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी हे युक्तीवाद करत आहेत. यामध्ये मागील एक तासापासून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद सुरु आहे.

कपिल सिब्बल म्हणाले,

1 ) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी प्राथमिक की अंतीम हे स्पष्ट करा. यावर निवडणूक आयोगाने आत्ताच सांगता येणार नाही, असे स्पष्ट उत्तर दिले.

2) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आयोगात सुनावणी नको, अशी भूमिका घेतली.

3) शिंदे गटाची सादर कागदपत्रे बोगस, असल्याचा दावा ठाकरे गटाने केला.

शिंदे गटाकडून जेठमलानी हे बांजू मांडत आहेत. ते म्हणाले...

1) शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याचा दावा

2) धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत महत्वाचे ते आमच्याकडे आहे, असेही शिंदे गटाने म्हटले आहे.

3) कायद्याच्या निकषावर शिंदे गटाची बाजू योग्य व भक्कम, असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.

4) तसेच शिवसेनेच्या घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी बदल केला. सर्व अधिकार स्वत:च्या हातात ठेवले, असे शिंदे गटाचा दावा.

5) शिंदे गटाची रचना शिवसेनेच्या घटनेनुसारच आहे.

6) शिवसेनेची घटना कशी हे जेठमलानी यांनी आयोगासमोर स्पष्ट केले.

7) शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेबांवर केंद्रीत होती.

8) बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी घटनेत केलेला बदल बेकायदेशीर, असल्याचा दावा.

9) उद्धव ठाकरेंकडे असलेले शिवसेना पक्षप्रमुख बेकायदेशीर, असल्याचे शिंदे गटाचे म्हणने.

10 ) बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी अधिकार स्वतःकडे ठेवणे हे बेकायदेशीर आहे.

11) राष्ट्रीय कार्यकारणीत जुलै 2022 मध्ये शिंदेंची मुख्यनेता म्हणून निवड करण्यात आली होती.

12) शिंदेंच्या निवडीमुळे ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही, असाही दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाकडून 22 लाख 24 हजार 950 प्रतिज्ञापत्रे तर शिंदे गटाकडून 4 लाख 51 हजार 127 इतके प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटाकडून लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. शिंदे गटाच्या वकिलांचा दावा आहे, की सर्व निकषामध्ये आम्ही पुढे आहोत. त्यातच आमच्याकडे निवडून आलेले जास्त प्रतिनिधी आमच्या बाजूला आहेत.

लाखोंच्या संख्येने शिंदे गटाकडून चार बॅगमधून आणलेले कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यापूर्वीही कागदपत्रे निवडणूक आयोगात दाखल झाले आहे. प्रतिज्ञापत्रांसाठी दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला मुदत मागितली गेली.

ठाकरे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारणीतील प्रतिनिधींची 107 प्रमाणपत्रे, संघटनात्मक प्रतिनिधींची 2 लाख 82 हजार प्राथमिक सदस्यांची 19 लाख नोंदणी व प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत.

शिंदे गटाकडून प्राथमिक सदस्य 4 लाख 48 हजार. 13 खासदार आणि 40 आमदारांसह संघटनात्मक प्रतिनिधी 711 आहे.

शिंदे गटाकडे एकूण 4 लाख 51 हजार 127 एवढी प्रतिज्ञापत्र आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाकडून कागदपत्रे आणली गेली.

कागदपत्रांचे गठ्ठे एका मोठ्या खोलीत जमा करण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT